Memes Viral: vivek oberoi on aishwarya rai bachchan memes viral amitabh salman abhishek | Memes Viral :  विवेक ओबेरॉयचा बदला घेण्यासाठी निघाले अमिताभ,अभिषेक अन् सलमान!!
Memes Viral :  विवेक ओबेरॉयचा बदला घेण्यासाठी निघाले अमिताभ,अभिषेक अन् सलमान!!

ठळक मुद्देविवेकने आपल्या सोशल अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम्स शेअर केले होते. त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीम्स शेअर करत, सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची थट्टा उडवणे विवेक ओबेरॉयला चांगलेच महागात पडले.  चहूबाजूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठली. विवेकच्या ट्वीटवर सोनम कपूरने फालतू, अर्थहीन अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. उर्मिला मातोंडकर, राणी मुखर्जीनेही त्याला फटकारले. एवढेच नाही तर राष्ट्रीय महिला आयोग आणि काँग्रेस पक्षानेही त्याला अटक करण्याची मागणी केली. हे प्रकरण चिघळणार, असा अंदाज येताच विवेकने माफी मागितली. माझ्यामुळे एकही महिला दुखावली गेली असेल तर ती चूक सुधारलीच पाहिजे. मी ते ट्वीट डिलीट केले असून सर्वांची माफी मागतो, असा शहाणपणा त्याने दाखवला.
अर्थात या माफीनंतरही सोशल मीडिया विवेकला इतक्या सहजपणे थोडेच सोडणार? तूर्तास विवेकच्या या ‘अविवेकी’ वागण्यावरचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातले एक मीम्स चांगलेच खास आहे. होय, सूडाग्नीने पेटलेले अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चनसलमान खान विवेकचा बदला घेण्यासाठी निघाले आहेत. त्यांच्या हातात बॉम्ब, रिव्हॉल्व्हर आहे, असे यात दाखवण्यात आले आहे. अतिशय ड्रामेट्रिक अंदाजातील या मीम्ससाठी अ‍ॅक्शन चित्रपटातील एका सीनला फोटोशॉप्ड करण्यात आले आहे.  
विवेकने आपल्या सोशल अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम्स शेअर केले होते. पण त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण हे ट्वीट आणि हे मीम शेअर करताना त्याने केवळ एक्झिट पोलचीच नाही तर ऐश्वर्या राय बच्चन हिचीही खिल्ली उडवली होती.  विवेकने ट्वीट केलेल्या मीम्समध्ये तीन फोटो होते. यातील पहिल्या सर्वात वरच्या फोटोत सलमान खान आणि ऐश्वर्या राय होते. या फोटोला ‘ओपिनियन पोल’ असे कॅप्शन देण्यात आले आहे होते. दुस-या फोटोत ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत होते. याला‘एक्झिट पोल’ असे लिहिलेले होते. तिस-या फोटोत ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन व आराध्याचा फोटो होता आणि यावर ‘रिझल्ट’ असे लिहिले होते.
विवेकने हे मीम शेअर करताना त्यासोबत लॉफिंग इमोजी पोस्ट केले होते. सोबत, ‘नो पॉलिटिक्स हिअर, जस्ट लाईफ’ असे लिहिले होते.   


Web Title: Memes Viral: vivek oberoi on aishwarya rai bachchan memes viral amitabh salman abhishek
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.