ठळक मुद्देशबाना आझमी आणि दिग्दर्शक शेखर कपूर हे एकेकाळी नात्यात होते. त्या दोघांनी इश्क इश्क इश्क या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची सगळ्यात पहिल्यांदा ओळख झाली

जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध कपल मानले जाते. त्या दोघांना अनेकवेळा फिल्मी पार्ट्यांमध्ये, पुरस्कार सोहळ्यात पाहाण्यात येते. शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचे लग्न होण्यापूर्वी जावेद यांचे लग्न हनी इराणी यांच्यासोबत झाले होते. त्यांना फरहान आणि झोया ही दोन मुले देखील आहेत. तुम्हाला माहीत आहे का, जावेद यांच्यासोबत लग्न करण्याआधी शबाना देखील एका दिग्दर्शकासोबत नात्यात होत्या. त्या काळात हे प्रेमप्रकरण मीडियात चांगलेच गाजले होते. 

शबाना आझमी आणि दिग्दर्शक शेखर कपूर हे एकेकाळी नात्यात होते. त्या दोघांनी इश्क इश्क इश्क या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची सगळ्यात पहिल्यांदा ओळख झाली आणि त्यांच्यात खूप चांगली मैत्री निर्माण झाली. शबाना एक अभिनेत्री म्हणून यशस्वी होत असल्या तरी शेखर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत होते. अभिनेता म्हणून यश मिळवणे त्यांच्यासाठी कठीण जात होते. त्यामुळे शेखर यांच्या व्यवसायिक आयुष्याची मीडियात चर्चा होत नव्हती. पण दुसरीकडे त्यांच्या आणि शबाना आझमी यांच्या अफेअरच्या चर्चांना मीडियात ऊत आले होते. शबाना आणि शेखर जवळजवळ सात वर्षं नात्यात होते. पण त्या दोघांनी संगनमताने ब्रेकअप करण्याचे ठरवले. ब्रेकअपनंतरही ते दोघे एकमेकांचे खप चांगले फ्रेंड्स होते. त्यामुळेच ब्रेकअपनंतर देखील शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या मासूम या चित्रपटात शबाना आझमी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 

मासूम या चित्रपटाच्यावेळी मेघा गुजराल या शेखर कपूर यांना असिस्ट करत होत्या. या चित्रपटानंतर काहीच वर्षांत शेखर कपूर यांनी मेघा यांच्यासोबत लग्न केले. पण लग्नानंतर काहीच वर्षांत शेखर आणि सुचित्रा कृष्णमुर्ती या अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा सुरू झाल्यामुळे मेघा यांनी शेखर यांच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर शेखर यांनी सुचित्रासोबत लग्न केले तर मेघा प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. 


 


Web Title: Before married to Javed Akhtar Shabana azmi was in relationship with director shekhar kapoor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.