marathi veteran actor sachin pilgaonkar takes first dosage of corona vaccine | ‘महागुरु’ सचिन पिळगावकर यांनी घेतली कोरोना लस, शेअर केला फोटो

‘महागुरु’ सचिन पिळगावकर यांनी घेतली कोरोना लस, शेअर केला फोटो

ठळक मुद्देसचिन यांनी केवळ अभिनयच केला नाही तर दिग्दर्शक, निमार्ता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. 

कोरोनाने सर्वांना धडकी भरवली असताना कोरोना प्रतिबंधक लसीने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम सुरू आहे. मराठी सिनेविश्वाचे महागुरु आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही करोना  प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे.
काल 8 मार्चला सचिन यांनी लसीचा पहिला डोस घेतला. यादरम्यानचा फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. आईने सुद्धा कोरोना लस घेतल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी डॉक्टर आणि तिथल्या मेडिकल स्टाफचे आभारही मानले आहेत.

त्यांच्या या पोस्टनंतर लोकांनी त्यांना तंदुरूस्त राहा, असे म्हणत शुभेच्छा दिल्यात आहेत.
 गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनानंतर लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसत होते. वारंवार आवाहन करूनसुद्धा काही लोक ऐकायला तयार नव्हते. अशा लोकांवर अभिनेते सचिन पिळगावकर संतापले होते. ‘थोडं तरी डोक्याचा वापर करा’, असे म्हणत त्यांनी विनाकारण बाहेर फिरणाºया लोकांना सुनावले होते. 

सचिन यांनी केवळ अभिनयच केला नाही तर दिग्दर्शक, निमार्ता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. 
उण्यापु-या वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून  अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि यांतर तब्बल 65 चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केले.  मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार त्यांना मिळाला. 1966 मध्ये ‘झिंबो का बेटा’ या चित्रपटातून त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला. अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: marathi veteran actor sachin pilgaonkar takes first dosage of corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.