Manorama On Death Anniversary Veteran Actress Comedian, Beloved Chachi Of Seeta Aur Geeta | हेमा मालिनींच्या संपत्तीवर डोळा होता या अभिनेत्रीचा, 'चाची'च्या भूमिकेतून झाली होती लोकप्रिय

हेमा मालिनींच्या संपत्तीवर डोळा होता या अभिनेत्रीचा, 'चाची'च्या भूमिकेतून झाली होती लोकप्रिय

१९७२ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'सीता और गीता'मधील कौशल्या चाचीच्या भूमिकेतून अभिनेत्री मनोरमा खूप लोकप्रिय झाल्या होत्या. मनोरमा यांनी त्यांच्या करियरमध्ये जास्तीत जास्त निगेटिव्ह व कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. दो कलिया, दो फूल आणि सीता और गीतामधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत.


मनोरमा यांनी दीपा मेहता यांच्या वॉटर या चित्रपटात शेवटचे काम केले होते. मनोरमा यांनी लाहौरमधून बालकलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांनी राजा नक्सरसोबत लग्न केले होते. भारताच्या फाळणीनंतर ते दोघे भारतात कायमचे स्थलांतरीत झाले आणि निर्माते बनले.


चित्रपटांमध्ये मनोरमा यांनी क्रुर चाची, सावत्र आईच्या भूमिका साकारल्या आहेत. यातील काही भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आणि चीडदेखील निर्माण केली. सीता और गीतामध्ये मनोरमा यांची कुणीच बरोबरी करू शकले नाही. त्यांचे गोलमटोल डोळे, मटकून बोलणे, बिचाऱ्या सीतेच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्रास देणे आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहे. 


मनोरमा यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीत १००हून जास्त चित्रपटात काम केले आहे. जास्त त्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. २००८ साली मनोरमा यांच्या दीर्घ आजारामुळे निधन झाले.

Web Title: Manorama On Death Anniversary Veteran Actress Comedian, Beloved Chachi Of Seeta Aur Geeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.