ब्रेकअप वगैरे विसरा! मलायका व अर्जुन गेले लंच डेटवर, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 11:02 AM2022-01-17T11:02:14+5:302022-01-17T11:04:31+5:30

Malaika Arora and Arjun Kapoor seen together : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा  नुकतीच रंगली होती. पण आता या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायला हवा.

malaika arora spotted with arjun kapoor enjoy lunch date amid breakup rumors couple- | ब्रेकअप वगैरे विसरा! मलायका व अर्जुन गेले लंच डेटवर, पाहा व्हिडीओ

ब्रेकअप वगैरे विसरा! मलायका व अर्जुन गेले लंच डेटवर, पाहा व्हिडीओ

Next

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांचं ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा  नुकतीच रंगली होती. पण आता या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायला हवा. या व्हिडीओत मलायका व अर्जुन दोघंही एकत्र दिसत आहेत. रविवारी दोघांनीही लंच डेट एन्जॉय केली. रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबईतील वांद्र्रे येथील रेस्टॉरन्टबाहेर कपलला स्पॉट केलं गेलं. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने या कपलचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर   शेअर केला आहे. यावेळी मलायकाने रफल्ड व्हाइट ड्रेस घातला होता, तर अर्जुनने निळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि डेनिम घातली होती.

गेल्या आठवड्यात मलायका व अर्जुनचं ब्रेकअप झाल्याचा दावा केला गेला होता. अर्जुनने कुटुंबाच्या दबावामुळे मलायकाशी ब्रेकअप केल्याचा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. ब्रेकअपमुळे मलायका सहा दिवसांपासून घराबाहेर पडली नसून तिची अवस्था फारच वाईट असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं. यानंतर अर्जुन व मलायका दोघांनीही ब्रेकअपच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या. अफवांना काहीही जागा नाही, अशी पोस्ट अर्जुनने शेअर केली होती. मलायकासोबतचा एक फोटो शेअर करत त्याने लिहिलं होतं की, ‘अफवांना जागा नाही. सर्वजण सुरक्षित रहा, आनंदी रहा. लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो.’ 

पाठोपाठ मलायकानेही एक पोस्ट शेअर करत ब्रेकअपच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. ‘चाळीशीत कोणाला प्रेम मिळत असेल तर त्याकडे सामान्य नजरेतून पाहा.. असं वागणं थांबवा आणि प्रगल्भ बना,’ असं तिनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
अर्जुन कपूर आणि मलायका तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे हॉट कपल खुल्लमखुल्ला एकत्र फिरताना दिसतं.

Web Title: malaika arora spotted with arjun kapoor enjoy lunch date amid breakup rumors couple-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app