Malaika Arora has the cutest comment on Arjun Kapoor's nakli Panipat look | सो क्यूट! अर्जुन कपूरचा ‘नकली’ लूक पाहून मलायका अरोरा झाली क्रेजी!!
सो क्यूट! अर्जुन कपूरचा ‘नकली’ लूक पाहून मलायका अरोरा झाली क्रेजी!!

ठळक मुद्देअर्जुन कपूरचा ‘पानीपत’ हा चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित करतोय. यापूर्वी आशुतोषने ‘लगान’, ‘जोधा अकबर’ सारखे शानदार चित्रपट दिले आहेत.

अर्जुन कपूरमलायका अरोरा यांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. गेल्या काही दिवसांत दोघेही अगदी जगाची पर्वा न करताना एकमेकांसोबत फिरताना दिसताहेत. अर्जुन व मलायकाने आपले नाते ना जगापासून लपवले, ना जगासमोर त्याची कबुली दिली. पण आता हे नाते लग्नाच्या निर्णयापर्यंत पुढे गेले आहेत. लवकरच हे हॉट कपल लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे.
अलीकडे अर्जुन कपूरने त्याचा आगामी चित्रपट ‘पानीपत’चा ‘नकली’ फर्स्ट लूक शेअर केला. तर हा आहे ‘पानीपत’चा फर्स्ट लूक, असे कॅप्शन देत अर्जुनने सोबत आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला.  अर्जुनच्या या पोस्टवर मलायकाने अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिली.  हाहाहा, सो क्यूट...असे मलायकाने लिहिले.

अर्जुन कपूरचा ‘पानीपत’ हा चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित करतोय. यापूर्वी आशुतोषने ‘लगान’, ‘जोधा अकबर’ सारखे शानदार चित्रपट दिले आहेत. आता आशुतोष ‘पानीपत’ घेऊन येतोय. या ऐतिहासिक चित्रपटात अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहे.‘पानीपत’मध्येअर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिका जिवंत करणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर व संजय दत्त तलवारबाजी करताना दिसणार आहेत. क्रितीही यासाठी तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतेयं.
इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेली तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की ही युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता. 


 


Web Title: Malaika Arora has the cutest comment on Arjun Kapoor's nakli Panipat look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.