ठळक मुद्देरोहित व श्वेता यांची लव्हस्टोरी पाच वर्षांपूर्वी सुरु झाली होती.

वर्षभरापूर्वी  या अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता आणि आता वर्षभरानंतर या अभिनेत्रीने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. होय, लग्नानंतर वर्षभरातच पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा या अभिनेत्रीने केली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे, श्वेता बासू प्रसाद. 


 इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत श्वेताने पती रोहित मित्तलपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली.

‘रोहित मित्तल आणि मी दोघांनीही परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिन्यानंतर एकमेकांच्या भल्यासाठी आम्ही या निर्णयाप्रत पोहोचलो आहोत. सर्व पुस्तके केवळ मुखपृष्ठावरून वाचावीत, अशी नसतात. याचा अर्थ हा नाही की, ती पुस्तक वाईट असतात. पण काही गोष्टी अर्धवट सोडलेल्याच ब-या. मला इतके यादगार क्षण दिल्याबद्दल रोहित तुझे आभार. तुझे भावी आयुष्य आनंददायी होवो, तुझीच चिअरलीडर’असे तिने लिहिले.


रोहित व श्वेता यांची लव्हस्टोरी पाच वर्षांपूर्वी सुरु झाली होती. ‘फँटम’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. लग्नाआधी दोन वर्षे ते लिव्ह इनमध्ये राहिले. 2017 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि 2018 मध्ये लग्न. 13 डिसेंबर 2018 रोजी श्वेताने निर्माता रोहित मित्तलसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली होती. पुण्याच्या एका पंचतारांकित हॉटेलात बंगाली पद्धतीने विवाहसोहळा झाला होता. या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. यानंतर काहीच महिन्यांपूर्वी दोघांच्या रोमॅन्टिक व्हॅकेशनचे फोटोही असेच व्हायरल झाले होते.


श्वेताने 2002 मध्ये ‘मकडी’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर ती अनेक चित्रपटांत झळकली. अलीकडे रिलीज झालेल्या ‘द ताश्कंद फाईल्स’ या चित्रपटात श्वेता दिसली होती. याश्विाय मर्द को दर्द नहीं होता, बद्री की दुल्हनिया या चित्रपटातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत होती.
2014 मध्ये श्वेताचे नाव एका सेक्स स्कँडलमध्ये आले होते. तिला हैदराबादमध्ये एका रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर तिला हैदराबाद सेशन कोर्टाने क्लीन चीट दिली होती. 

Web Title: makdee actress shweta basu prasad officially announces separation with husband after one year of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.