Mahima Chaudhary papped with teenage daughter ariana video viral | महिमा चौधरीच्या लेकीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, जबरदस्त व्हायरल होतोय व्हिडीओ

महिमा चौधरीच्या लेकीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, जबरदस्त व्हायरल होतोय व्हिडीओ

ठळक मुद्देमहिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे. महिमाने आपले मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावानेच सुरु केले होते. पण सुभाष घर्इंनी ‘परदेस’ सिनेमात तिला कास्ट केले आणि त्यांनीच तिचे महिमा असे नामकरणही केले.

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary)  फिल्मी दुनियेतून गायब आहे. पण हीच महिमा सोशल मीडियावर मात्र प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अर्थात सध्या महिमाची नाही तर तिच्या लेकीची चर्चा होतेय. होय, महिमाच्या लेकीच्या (Ariana Mukherji) सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
महिमाच्या लेकीचे नाव आहे अरियाना. अलीकडे महिमा तिच्या लेकीसोबत डेंटिस्टकडे पोहोचली. यावेळी दोघी मायलेकींनी मीडियाला पोज दिल्या.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक महिमाच्या लेकीचे कौतुक करताना थकत नाहीयेत. अनेकांनी तिची तुलना आई महिमासोबत केली आहे.
अरियानाचे कौतुक पाहून महिमाचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. तिने विरल भयानीच्या पोस्टवर कमेंट करत, अरियानाला टॅग केले आहे.

महिमा चौधरीने 2006 साली मुंबईतील आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांतच तिने मुलीला जन्म दिला. महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, अशी चर्चा यानंतर रंगली. पण आता महिमा बॉबीपासून विभक्त झाली आहे. 2013 मध्ये बॉबी आणि महिमा विभक्त झाले. आता महिमा सिंगल मदर म्हणून मुलांचा संभाळ करते. मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी महिमाने बरीच मोठी कायदेशीर लढाई लढली. 

महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे. महिमाने आपले मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावानेच सुरु केले होते. पण सुभाष घर्इंनी ‘परदेस’ सिनेमात तिला कास्ट केले आणि त्यांनीच तिचे महिमा असे नामकरणही केले. ‘परदेस’ सिनेमापूर्वी एका जाहिरातीत महिमा झळकली होती. या जाहिरातीत महिमाला पाहून सुभाष घई यांनी आपल्या चित्रपटात संधी दिली होती. बॉलिवूडच्याच नव्हे तर महिमाच्या पर्सनल लाईफमध्येही अनेक चढउतार आले. फ्लॉप करिअर, लग्नापूवीर्ची प्रेग्नेंसी, लिएंडर पेससोबतचे अफेअर अशा एक ना अनेक गोष्टींमुळे महिमा चर्चेत राहिली.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahima Chaudhary papped with teenage daughter ariana video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.