'देव डी', 'साहेब बीवी और गुलाम' आणि 'नॉट ए लव स्टोरी' यांसारख्या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री माही गिल हिला बॉलिवूडमध्ये दहा वर्षे झाले. तरीदेखील ती करियरच्याबाबतीच समाधानी नसून तिला एका गोष्टीची खंत देखील वाटते. ती सांगते की,'मला अशाच भूमिका मिळातात, ज्यामुळे मी एकाच प्रकारच्या भूमिका करत असल्याचा शिक्का लावण्यात आला आहे.' 

माही गिलने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 'मला अशा भूमिकांसाठी विचारलं जाते ज्यात सेक्सी किंवा बार गर्लची भूमिका असते. यासोबत जेव्हा कॉलगर्ल किंवा हातात दारूचा ग्लास असणाऱ्या महिलेची भूमिका करायचा असेव तर माही गिलची आठवण काढली जाते.' ती पुढे म्हणाली की, 'मला साहेब, बीवी और गँगस्टर चित्रपटासारख्या भूमिकांसाठी विचारले जाते. मात्र आता मला काहीतरी नवीन करायचं आहे.'


माही म्हणाली की, 'भलेही मला बॉलिवूडमध्ये दहा वर्षांहून जास्त झाले आहेत. मात्र अद्याप मला जशी भूमिका हवी आहे तशी मिळाली नाही. बॉलिवूडमध्ये कित्येक कलाकार मोठ्या घराण्यातील आहे. मात्र त्यातील सगळेच चांगले अभिनय करतात असं नाही. जर तुम्ही माझा करियर ग्राफ पहाल तर तुमच्या लक्षात येईल की मला साचेबद्ध भूमिका मिळाल्या आहेत.'


माही गिल लवकरच 'फॅमिली ऑफ ठाकुरगंज' चित्रपटात झळकणार आहे, या चित्रपटात तिच्यासोबत सौरभ शुक्ला, जिमी शेरगिल, मनोज पाहवा व मुकेश तिवारी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती.

यावेळी तिने तिला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक कसा मिळाला, याबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, एका बर्थडे पार्टीमुळे तिला पहिला सिनेमा मिळाला. त्या बर्थडे पार्टीत ती चार तास डान्स परफॉर्म करत होती. त्या पार्टीत अनुराग कश्यप होते. त्यांनी मला नोटीस केलं आणि त्यानंतर त्यांनी मला 'देव डी' चित्रपटासाठी विचारलं.


Web Title: Mahie gill upset with bollywood because typcast role like bar girl in films
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.