बॉलिवूडमध्ये अनेक सुंदर चेहरे आहेत. पण सौंदर्य असूनही यश मिळतेच, असे मात्र मुळीच नाही. आता या अभिनेत्रींचेच बघा ना, सुंदर चेहरा असूनही यांच्या हाताला काम नाही. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टिस्का चोप्रा

सौंदर्यात अनेक बड्या-बड्या अभिनेत्रींना मात देणा-या टिस्का चोप्राचे करिअरही फार खास चालले नाही. म्हणायला टिस्का दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये आहे. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आमिर खानच्या ‘तारें जमीं पर’ या चित्रपटातून टिस्काला ओळख मिळाली. यात तिने आईची भूमिका साकारली. मात्र आघाडीची अभिनेत्री बनण्याचे भाग्य तिच्या वाट्याला आले नाही. 

हुमा कुरेशी

हुमा कुरेशीच्या सौंदर्याचे अनेक दिवाने आहेत. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटानंतर हुमा नावारूपाला आली. यानंतर ती अनेक चित्रपटांतही दिसली. पण अनेकांच्या वाट्याला आलेले स्टारडम मात्र तिच्या वाट्याला आलेच नाही.

निमरत कौर

निमरत कौर म्हणजे बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री. अक्षय कुमारसोबत ‘एअरलिफ्ट’ या सिनेमात ती लीड रोलमध्ये दिसली. ‘लंचबॉक्स’ या सिनेमातही तिच्या अभिनयाचे अपार कौतुक झाले. पण याऊपरही तिला सिनेमे मिळाले नाहीत.

रिचा चड्ढा

बॉलिवूडची ‘भोली पंजाबन’रिचा चड्ढा खरे तर हिरोईन बनण्यासाठी बॉलिवूडमध्ये आली होती. पण तिला चित्रपटात मिळाले ते केवळ साईड रोल. ‘फुकरे’ने तिला मोठे यश मिळाले. पण अभिनेत्री म्हणून तिचे करिअर फार चमकू शकले नाही.

माही गिल

माही गिल बॉलिवूडच्या बोटांवर मोजण्याइतक्या सिनेमात झळकली. देव डी या सिनेमाने तिला ओळख दिली. पण करिअर मात्र फ्लॉप ठरले.

प्राची देसाई

प्राची देसाईच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. पण तिच्या चित्रपटांनी मात्र प्रेक्षकांची निराशा केली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mahi gill to huma qureshi these beautiful actress have not work-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.