ठळक मुद्देदबंग या चित्रपटात एक लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनाक्षी, सलमान आणि अश्वमी मांजरेकर यांच्यात हे लव्ह ट्रँगल असल्याचे म्हटले जात आहे. अश्वमी ही प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. 

सलमान खानचा भारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या नुकत्याच भेटीस आला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची कथा, सलमानचा अभिनय, सलमान-कतरिना कैफची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. या चित्रपटानंतर सध्या सलमान दबंग 3 या त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत असून या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. सोनाक्षी याआधी सलमानसोबत दबंग आणि दबंग 2 या चित्रपटात झळकली होती. दबंग 3 या चित्रपटात आता चुलबूल पांडेचा भूतकाळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दबंग या चित्रपटातील पोलिस ऑफिसर चुलबुल पांडे प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. पोलिस ऑफिसर बनण्यापूर्वी चुलबुल कसा होता हे प्रेक्षकांना आता दबंग 3 या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेचे वय दबंग आणि दबंग 2 या दोन्ही चित्रपटांपेक्षा कमी असल्याने सलमान सध्या या चित्रपटासाठी वजन कमी करत आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाच त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. पण त्याचसोबत या चित्रपटात एक लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनाक्षी, सलमान आणि अश्वमी मांजरेकर यांच्यात हे लव्ह ट्रँगल असल्याचे म्हटले जात आहे. अश्वमी ही प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. 

बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीत गॉडफादर म्हणून ओळखला जातो.अनेक नवोदित अभिनेत्रींना त्याने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल टाकण्याची पहिलीवहिली संधी मिळवून दिली. सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, स्नेहा उल्लाल, झरीन खान अशी किती तरी नावं आपल्याला घेता येतील. याच यादीत आता अश्वमीच्या नावाचा देखील समावेश होणार आहे. 

अश्वमीला 'दबंग-3' या चित्रपटाद्वारे सलमान लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रज्जोच्या वडिलांची भूमिका महेश मांजरेकर यांनी साकारली होती. त्यामुळे दबंग ३ या चित्रपटात अश्वमीसह महेश मांजरेकरही झळकल्यास बाप-लेकीची रिअल जोडी रुपेरी पडद्यावर एकाच चित्रपटात पाहण्याचा योग जुळून येईल. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahesh Manjrekar's daughter Ashwami Manjrekar will play salman khan love interest in Dabangg 3?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.