Mahesh Bhatt's brother files defamation suit against actress | महेश भट यांच्या भावाने अभिनेत्रीवर दाखल केला मानहानीचा दावा

महेश भट यांच्या भावाने अभिनेत्रीवर दाखल केला मानहानीचा दावा

मुंबई : दिग्दर्शक महेश भट यांचे बंधू मुकेश भट यांनी अभिनेत्री लविना लोध हिच्याविरोधात उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. भट बंधूंवर खोटे आरोप केल्याचा त्यांचा दावा आहे.

या दाव्यावर सोमवारी तत्काळ सुनावणी घेण्यात आली. त्यावर न्यायालयाने लविना हिला दाव्यावर उत्तर देण्याचे निर्देश देत या दाव्यावर तीन आठवड्यांनी सुनावणी ठेवली. दरम्यान, लविनाच्या वकिलांनी लविना यापुढे भट यांच्याविरुद्ध काहीही विधान करणार नाही, असे आश्वासन न्यायालयाला दिले.
गेल्या आठवड्यात लविनाने समाजमाध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तिने आपण एका सुमित सबरवाल याच्याशी विवाह केल्याचे म्हणत तिचा नवरा महेश भट यांचा भाचा असल्याचा दावा केला.  तिने सबरवाल ड्रग्सचा व्यवसाय करत असून मानवी तस्करी करत असल्याचाही दावा या व्हिडीओत केला आहे.

तर हा व्यवसाय महेश भट चालवत असल्याचे खळबळजनक विधान केले. त्यानंतर महेश भट यांचे वकील अमित नाईक यांनी लविनाला कायदेशीर नोटीस पाठवत असे तथ्यहीन आरोप करू नयेत, असे बजावले. लविनाला अशी विधाने करण्यापासून थांबवावे व एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या दाव्यात केली आहे. तसेच लविनाला तो वादग्रस्त व्हिडीओ संबंधित समाजमाध्यमावरून काढण्याचे आदेश द्यावेत, अशीही विनंती भट यांनी केली.

English summary :
Mahesh Bhatt's brother files defamation suit against actress

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahesh Bhatt's brother files defamation suit against actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.