ठळक मुद्देया फोटोतील सुहाना आणि आत्ताची सुहाना पाहिल्यानंतर क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

शाहरूख खान व गौरी खान यांची मुलगी सुहाना खान, चंकी पांडे व भावना पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर लहानपणापासून मैत्रिणी आहेत. या तिघींना ‘चार्लीज एंजल ऑफ बॉलिवूड’ म्हटले जाते. यापैकी अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून बॉलिवूड डेब्यू केला. सध्या ती ‘पती पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये बिझी आहे. शनाया कपूर ही सुद्धा लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. शाहरूखची लेक सुहाना खान हिचे म्हणाल तर सध्या ती शिकतेय. पण तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चाही जोरात आहेत. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, एक थ्रोबॅक फोटो. 


होय, शनायाची आई महीप कपूर हिने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो बराच जुना आहे. यात महिप, शनाया,भावना, अनन्या, सुहाना व गौरी असे सगळे दिसत आहेत. ‘TimeFlies’, असे हा फोटो शेअर करताना महीपने लिहिले आहे.

हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनांच्या भुवया उंचावल्या. याचे कारण म्हणजे, सुहाना. होय, सुहानाला पाहून आत्ताची सुहाना हीच यावर विश्वास बसत नाही. या फोटोत सुहाना अगदीच साधीसरळ दिसतेय.


या फोटोतील सुहाना आणि आत्ताची सुहाना पाहिल्यानंतर क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सुहानाची पर्सनॅलिटी पूर्वीपेक्षा एकदम बदलली आहे.
सध्या सुहाना न्यूयॉर्कमध्ये उच्चशिक्षण घेत आहे. नुकताच तिने न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश घेतला. सुहानाचे रोज नवे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा सुरु आहेत.  

 
 


Web Title: maheep kapoor share this throwback thursday picture of ananya panday shanaya kapoor suhana khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.