OMG! बँक लुटणार होती प्रियंका चोप्रा, महाराष्ट्र पोलिसांनी पकडले ‘रंगेहाथ’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 10:12 AM2019-09-11T10:12:17+5:302019-09-11T15:00:34+5:30

कालच प्रियंकालाच्या ‘स्काय इज पिंक’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहून महाराष्ट्र पोलिसांचा संताप अनावर झाला

maharashtra police tweeted about ipc section 393 for priyanka chopra film the sk is pink | OMG! बँक लुटणार होती प्रियंका चोप्रा, महाराष्ट्र पोलिसांनी पकडले ‘रंगेहाथ’!!

OMG! बँक लुटणार होती प्रियंका चोप्रा, महाराष्ट्र पोलिसांनी पकडले ‘रंगेहाथ’!!

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. प्रियंकाने यात एका टीनेजर मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे.

सुमारे तीन वर्षांनंतर प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. तिचा कमबॅक सिनेमा ‘स्काय इज पिंक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कालच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहून महाराष्ट्र पोलिसांचा संताप अनावर झाला. महाराष्ट्र पोलिसांनी प्रियंकाला सात वर्षांच्या शिक्षेची आठवण करून दिली. 
आता ‘स्काय इज पिंक’च्या ट्रेलरमध्ये असे काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर एक डायलॉग. होय, ‘स्काय इज पिंक’मध्ये प्रियंका आणि फरहान अख्तर यांच्यात एक संवाद आहे. यात फरहान प्रियंकाला म्हणतो, ‘तुम देखना अदिती, एक दिन मैं इतने पैसे कमाऊंग की इन चीजों के बारे में सोचने की जरूरत भी नहीं पडेगी.’ यावर, ‘एकबार आयशा ठीक हो जाए, फिर साथ में बँक लूटेंगे,’ असे प्रियंका फरहानला म्हणते.



प्रियंकाच्या या दृश्याचा स्क्रीनशॉट शेअर करत महाराष्ट्र पोलिसांनी एक  ट्वीट केले आहे. ‘या गुन्ह्यासाठी तुम्हाला कलम 393 अंतर्गत दंड आणि 3 वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते,’ असे महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या  ट्वीटमध्ये म्हटले आहे.




महाराष्ट्र पोलिसांच्या या  ट्वीटनंतर प्रियंकाला तिच्या चुकीची जाणीव झाली. तिने लगेच एक  ट्वीट  केले. ‘ Oops मैं रंगे हाथों पकडी गई...,’ असे तिने लिहिले.
 ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. प्रियंकाने यात एका टीनेजर मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये एक भावनिक कथा सूत्र पाहायला मिळते. एकीकडे प्रियंका आणि फरहान अख्तरची प्रेमकहाणी आणि दुसरीकडे त्यांच्या मुलीला झालेला दुर्मिळ आजार अशी ही कथा आहे.

मुलीच्या आजारापणाबद्दल प्रियंका व फरहानला समजते तेव्हा तिच्या उपचारासाठी दोघांचा संघर्ष सुरु होतो. यादरम्यान नवरा-बायकोच्या नात्यात आलेला दुरावा, वाद असे सगळे काही यात आहे. मुलगी हेच विश्व असलेल्या प्रियंकाने यात एका खंबीर आईची भूमिका साकारली आहे.  सोनाली बोस हिने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात मोटिव्हेशन स्वीकर आयशा चौधरी आणि तिच्या पालकांची सत्य कथा दाखवण्यात आली आहे. येत्या ११ आॅक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

 

Web Title: maharashtra police tweeted about ipc section 393 for priyanka chopra film the sk is pink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.