आज राज्याच्या विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. हळूहळू नागरिक घरातून बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. काही सेलिब्रेटींनी सकाळी लवकरच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर काही सेलिब्रेटी मतदानाचा हक्क बजावताना दिसणार आहेत.

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधील भाजपचे खासदार व अभिनेता रवी किशनने मुंबईतील गोरेगाव येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिने अंधेरी पश्चिम येथील तिच्या मतदाना केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.

तर अभिनेत्री शुभा खोटे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
आमीर खानची पत्नी किरण रावनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. या दरम्यान तिच्यासोबत आमीर खान दिसला नाही.


अभिनेत्री लारा दत्त व महेश भूपती यांनी मतदान केल्यानंतर त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने वांद्रे पश्चिम येथे मतदान केलं आणि महाराष्ट्रातील नागरिकांना जास्त संख्येत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


तर रितेश देशमुख व त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांनी लातूरमध्ये जाऊन मतदान केले आहे. त्यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी आपल्या चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा व दिग्दर्शक आणि गीतकार गुलजार यांनी वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. 

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. 

दीपिका पादुकोण हिने वांद्रे पश्चिम येथे जाऊन मतदान केले आहे. 

शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 

अनिल कपूर व हृतिक रोशन यांनी अंधेरी पश्चिम येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले आहे. 

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अंधेरी पश्चिम येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले आहे. 

अंधेरी पश्चिम येथील मतदान केंद्रात अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

 


Web Title: Maharashtra Election 2019: Celebrities vote with Aamir Khan and Kiran Rao, see photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.