Madhuri Dixit, Ajay Devgan, Anil Kapoor's 'Total Dhamaal' trailer, see Haha Video | माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video
माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video

ठळक मुद्देविनोदाने परिपूर्ण 'टोटल धमाल'चा ट्रेलर

'धमाल' चित्रपटाचा तिसरा भाग 'टोटल धमाल'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर हे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

'टोटल धमाल'चा ट्रेलर पाहिल्यावर हा चित्रपट विनोदाने परिपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये असलेले अनेक कलाकार यापूर्वी 'धमाल' आणि 'डबल धमाल' या चित्रपटांमध्ये झळकले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १७ वर्षानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच ५० कोटी रुपयांचे गुप्त धन आणि ते मिळविण्यासाठी संपूर्ण टीमने केलेले कारनामे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. पैशांसाठी जनकपूरपर्यंतचा प्रवास करताना या टीमला येणाऱ्या अडचणी अत्यंत विनोदीरित्या मांडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या चित्रपटातून हॉलिवूडची अॅनिमल सेलिब्रिटी क्रिस्टल देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या ट्रेलरमध्ये तिचीही एक झलक पाहायला मिळाली आहे.टोटल धमाल’ हा सिनेमा ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा सिनेमा ‘डबल धमाल’ होता. इंदर कुमारने काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, अनिल आणि माधुरी दीक्षित जवळपास 26 वर्षांनंतर एकत्र शूट करतायेत. आम्ही तिघांनी बेटा चित्रपटात एकत्र काम केले होते. ज्याला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. टोटल धमालमध्ये माधुरी आणि अनिल कपूर दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल कपूर यात अविनाश नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. 

Web Title: Madhuri Dixit, Ajay Devgan, Anil Kapoor's 'Total Dhamaal' trailer, see Haha Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.