ठळक मुद्देनिर्मात्याने मला विचारले होते की, मी तुला याच्या तिप्पट पैसे देईन... पण तुला माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील...

बॉलिवूडमध्ये आलेल्या मीटू वादळामुळे तनुश्री दत्तासोबत आतापर्यंत कित्येक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट प्रकार व लैंगिक शोषणाबाबतचा खळबळजनक खुलासा केला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी झरीन खान, एली अबराम व सुरवीन चावलाने कास्टिंग काऊचबाबतचा खुलासा केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री मानवी गगरूने एक खळबळजनक खुलासा केला आहे. 

मानवीने शुभ मंगल सावधान या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती काही वेबसिरिजमध्ये झळकली आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, एका वेबसिरिजमध्ये काम करण्यासाठी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. जवळजवळ एका वर्षापूर्वी मला एका निर्मात्याचा फोन आला होता आणि त्याने मला एका वेबसिरिजमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. वेबसिरिजमध्ये काम करण्यासाठी किती मानधन मिळेल असे मी विचारले असता मला खूपच छोटी रक्कम सांगण्यात आली होती. त्यावर त्या निर्मात्याने मला सांगितले होते की, मी तुला याच्या तिप्पट पैसे देईन... पण तुला माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील... त्या माणसाचा मला प्रचंड राग आला होता. मी अक्षरशः किंचाळतच त्याला म्हणाली की, तुझी इतकी हिंमतच कशी झाली... तू फोन ठेवतोस की....

मानवीने 2007 मध्ये धूम मचाओ धूम या कार्यक्रमापासून तिच्या करियरची सुरुवात केली होती. त्याचसोबत ती आजवर टीवीएफ ट्रीपलिंग, फोर मोर शॉट्स यांसारख्या वेबसिरिजमध्ये झळकली आहे. तिच्या फोर मोर शॉट्स या वेबसिरिजला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. 

Web Title: Maanvi Gagroo Reveals She Was Asked To "Compromise" To Get A Role In A Web-Series PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.