LOL Netizen troll Ranveer Singh's Golden outfit at the airport | गोल्डन आउटफिटमध्ये रणवीर सिंहचा लूक पाहून फॅन्स झाले हैराण, म्हणाले चॉकलेट रॅपर गुंडाळला काय !

गोल्डन आउटफिटमध्ये रणवीर सिंहचा लूक पाहून फॅन्स झाले हैराण, म्हणाले चॉकलेट रॅपर गुंडाळला काय !

आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलमुळे रणवीर सिंह सा-यांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असतो. कोणता एव्हेंट असो किंवा मग सिनेमाचे प्रमोशन रणवीर तुम्हाला अशाच अतरंगी पेहरावात दिसेल. त्यामुळे सध्या त्याच्या सिनेमापेक्षा त्याच्या कपड्यांवरच जास्त चर्चा रंगते. यामध्ये त्याचा एअरपोर्ट लूक पाहून सारेच चक्रावतात अशा ना-ना त-हा करत तो फिरत असतो. नुकतेच पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्डसाठी गुवाहाटीला रणवीर गेला होता. यावेळी स्टाइलिश प्रिंटेड ऑउटफिटमध्ये त्याने एंट्री घेताच सा-यांच्या नजरा फक्त त्याच्याकडेच वळल्या होत्या. 


त्या लूकचीही खूप चर्चा झाली. त्यानंतर आता चमचमत्या ड्रेसमध्ये रणवीर चक्क एअरपोर्टवर दिसला. गोल्डन रंगाच्या सूटमध्ये तो मुंबई एअरपोर्टवरून बाहेर पडताच सारेच थक्क झाले. रणवीरने गोल्डन सूटसह काळ्या रंगाची हाय नेक असलेली कॅपही घातली होती. अशात रणवीरचा हा पेहराव पाहून सारेच हसून हसून लोटपोट होत होते.


विशेष म्हणजे रणवीरचा हा अतरंगी लूक पाहून चॉकलेट रॅपर पासून ते एलियनपर्यंत, इतकेच नाहीतर भारताची लेडी गागाही म्हणूनही बोलले गेले. नेटीझन्स स्वतःहून त्याचे हे अतरंगी फोटो शेअर करत त्याची खिल्लीही उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका युजरने तर म्हटले की, चंद्रावर जाण्याची तयारी तर नाही ना, तर एका युजरने म्हटले की, गिफ्ट रॅप करणारा पेपरच गुंडाळाल्यासारखे वाटते. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रणवीर लवकरच '८३ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे. या सिनेमा दीपिका पादुकोण कपिल देवच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: LOL Netizen troll Ranveer Singh's Golden outfit at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.