Lokmat Most Stylish Awards 2019: पुढच्या 10 वर्षात काय काय करणार?; सांगतेय दीपिका पादुकोण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 12:12 AM2019-12-19T00:12:18+5:302019-12-19T00:14:30+5:30

फॅशन, लाईफस्टाईल, नातेसंबंधांवर लोकमतसोबत मनमोकळ्या गप्पा

Lokmat Most Stylish Awards 2019 i will work in digital media in future says deepika padukone | Lokmat Most Stylish Awards 2019: पुढच्या 10 वर्षात काय काय करणार?; सांगतेय दीपिका पादुकोण

Lokmat Most Stylish Awards 2019: पुढच्या 10 वर्षात काय काय करणार?; सांगतेय दीपिका पादुकोण

googlenewsNext

मुंबई: चित्रपट आणि डिजिटल यांच्यातली रेषा आता पुसट होत जात आहे. त्यामुळेच मला येत्या काळात डिजिटल माध्यमात काम करायला आवडेल, असं म्हणत अभिनेत्री दीपिका पादुकोणनं तिच्या भविष्यातील योजना लोकमतसोबत शेअर केल्या. लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याला दीपिका पादुकोण उपस्थित होती. यावेळी लोकमत मीडिया ग्रुपचे जॉईंट एमडी आणि एडिटोरियल डायरेक्टर ऋषी दर्डांनी तिच्यासोबत संवाद साधला. 

व्यावसायिक आणि समांतर चित्रपटांमधली रेषा हळूहळू पुसट होत आहे, असं मत दीपिकानं व्यक्त केला. यावेळी तिनं आगामी चित्रपट छपाकबद्दल भाष्य केलं. छपाकमधील भूमिका साकारणं अतिशय अवघड होतं. ती भूमिका मी अतिशय मनापासून साकारली आहे. त्यामुळे चित्रिकरण संपूनदेखील आजही ती भूमिका मला माझ्यात जाणवते. अद्यापही ती भूमिका मी विसरु शकलेले नाही, असं दीपिकानं सांगितलं. 



यावेळी दीपिकानं फॅशनबद्दलही भाष्य केलं. फॅशनमधून तुमचं व्यक्तिमत्त्व दिसतं. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबंब फॅशनमधून दिसत असतं. मी फॅशन ट्रेंड फॉलो करत नाही. मला ज्यामधून आत्मविश्वास मिळतो, तेच मी फॉलो करते, असं दीपिका म्हणाली. फॅशन, चित्रपटांसोबतच आयुष्य, नातेसंबंध यावरही दीपिकानं मनमोकळ्या गप्पा मारल्या. कोणत्याही नात्यात असताना तुम्ही एकमेकांचा आदर करायला हवा. तुमचे प्राधान्यक्रम निश्चित करायला हवेत. त्यामुळे केवळ माझं आणि रणवीरच नव्हे, तर माझ्या कुटुंबाचे प्राधान्यक्रमदेखील सारखेच आहेत, असं तिनं सांगितलं. 
 

Read in English

Web Title: Lokmat Most Stylish Awards 2019 i will work in digital media in future says deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.