ठळक मुद्देएनसीबीच्या तपासादरम्यान D N S K असा कोड समोर आहे. त्यामुळे एनसीबी त्या दिशेने आपला तपास केला.

ड्रग्जप्रकरणी रिया चक्रवर्ती तुरुंगात आहे़ दुसरीकडे आता या प्रकरणी बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांची नावे समोर येत आहेत. यातले एक नाव ऐकून सुरुवातीला सगळ्यांनाच धक्का बसला होता. ते म्हणजे दीपिका पादुकोण. ड्रग्जप्रकरणी दीपिकालाही एनसीबीने समन्स पाठवला आहे. उद्या 26 सप्टेंबरला दीपिका एनसीबीपुढे हजर राहणार आहे. त्यापूर्वी दीपिकाचा पती रणवीर सिंग याने एनसीबीला एक विनंती केली आहे. 26 तारखेला दीपिकाच्या चौकशीदरम्यान आपल्यालाही तिच्यासोबत हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती रणवीरने एनसीबीला केली आहे.

का हवी दीपिकासोबत राहण्याची परवानगी?
‘PeepingMoon.com ’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीरने यासाठी दीपिकाच्या आजाराचे कारण दिले आहे. दीपिकाला कधीकधी एन्जाइटी आणि पॅनिक अटॅक येतात. अशावेळी ती प्रचंड घाबरते़ अस्वस्थ होते, असे कारण रणबीरने सांगितले आहे. आपल्याला कायदेशीर नियम माहित आहेत. नियमानुसार, दीपिकाची चौकशी सुरु असताना मी हजर राहू शकत नाही. पण किमान दीपिकासोबत एनसीबीच्या कार्यालयाच्या आतपर्यंत येण्याची परवानगी तरी मिळावी, असे रणवीरने आपल्या विनंती अर्जात म्हटले आहे. रणवीरच्या या विनंती अर्जावर एनसीबीने अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे कळते.
दीपिका गुरुवारी रात्रीच गोव्यावरून मुंबईला पोहोचली. दीपिका एका शूटींगच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून गोव्यात होती.

ड्रग्जप्रकरणी दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावला आहे.  सध्या यावरून दीपिका पादुकोणचा पती रणवीर सिंग याला जबरदस्त ट्रोल केले जात आहे. त्याच्यावरचे एक ना अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.
ड्रग्ज कनेक्शनप्रकरणात दीपिकाचे नाव येताच रणवीर सिंग ट्रोल होतोय. पण नेटक-यांचा खरा राग दीपिकावर आहे़ कारण  सुशांत सिंग राजपूत डिप्रेशनमध्ये होता, असा दावा दीपिकाने केला होता. सुशांतबद्दलची तिची ही डिप्रेशनची थ्योरी अनेकांना आवडली नव्हती. आता दीपिका ड्रग्ज प्रकरणात फसल्यानंतर नेटकरी त्यावरून तिला लक्ष्य करत आहेत.
 

अशी अडकली दीपिका एनसीबीच्या जाळ्यात
एनसीबीच्या तपासादरम्यान D N S K असा कोड समोर आहे. त्यामुळे एनसीबी त्या दिशेने आपला तपास केला. D म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहे. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघांचीही चौकशी केली जाणार आहे.  
ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचे नावही समोर आले आहे. सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केले होते. सध्या अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीने आपल्या जबाबात साराच्या नावाचा खुलासा केला होता. केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूवीर्ही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचे व्यसन लागले होते़, असे तिने सांगितले होते. यानंतर सारा एनसीबीच्या रडारवर आली होती. याशिवाय श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग आणि सिमोन खंबाटा यांनाही एनसीबीने समन्स जारी केला आहे.

एनसीबीऐवजी सीबीआयने तपास करावा; रियाची मागणी

कोण आहे ड्रग्स केसमध्ये नाव आलेली सिमोन खंबाटा? जी आहे NCB च्या रडारवर...

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Let me stay with Deepika during interrogation ...! Husband Ranveer Singh's request to NCB, what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.