late actor chiranjeevi sarjas wife meghna raj sarja introduces his son to the world | VIDEO : दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाच्या प्रेमाची निशाणी; सुपर क्यूट आहे ज्युनिअर चिरू

VIDEO : दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाच्या प्रेमाची निशाणी; सुपर क्यूट आहे ज्युनिअर चिरू

ठळक मुद्दे 7 जून 2020 रोजी चिरंजीवी सरजावर काळाने झडप घातली. त्यावेळी मेघना तीनमहिन्यांची गर्भवती होती.

कन्नड सुपरस्टार चिरंजीवी सरजा याचे  हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या उण्यापु-या 39 व्या वर्षी चिरंजीवी सरजाने जगाचा निरोप घेतला. चिरंजीवी या जगातून गेला तेव्हा त्याची पत्नी मेघना राज तीन महिन्यांची प्रेग्नंट होती. गेल्या डिसेंबर महिन्यात मेघनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ज्युनिअर चिरंजीवीच्या जन्माने फॅन्स सुखावले होते.  आता मेघनाने ज्युनिअर चिरूची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
13 फेबु्रवारीच्या मध्यरात्री मेघनाने ज्युनिअर चिरूची पहिली झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून चिरंजीवी सरजाचे चाहते सुखावले आहेत. आत्तापर्यंत 5 लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

चिरंजीवी सरजा आणि मेघना यांनी 2 मे 2018 रोजी लग्न केले होते. हिंदू व ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. 7 जून 2020 रोजी चिरंजीवी सरजावर काळाने झडप घातली. त्यावेळी मेघना तीनमहिन्यांची गर्भवती होती. या कठीण काळात अख्खे सरजा कुटुंबीय खंबीरपणे मेघनाच्या पाठीशी उभे राहिले.

चिरंजीवी सरजाने 2009 मध्ये वायूपुत्र या चित्रपटाद्वारे कारकिदीर्ची सुरुवात केली होती. त्याने 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. यातील अनेक चित्रपट हिट ठरले होते.  

पतीच्या निधनानंतर मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘चिरु, मी ब-याच  वेळा प्रयत्न केला पण तुज्यासाठी माझ्या मनात असलेल्या भावना मला शब्दात व्यक्त करता नाही येत. तुझे माझ्यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे तू मला कधीही सोडून जाऊ शकला नाहीस. आपले मूल हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे. ते आपल्या प्रेमाची निशाणी आहे,’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: late actor chiranjeevi sarjas wife meghna raj sarja introduces his son to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.