या कारणामुळे आयुष्यभर लग्न करणार नाही लगान फेम ग्रेसी सिंग? आता दिसते अशी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 03:40 PM2021-06-15T15:40:55+5:302021-06-15T15:48:39+5:30

'लगान' या सिनेमात गौरी या भूमिकेत ग्रेसी सिंगला पाहायला मिळाले होते. भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली.

lagaan fame gracy singh looks now, still unmarried | या कारणामुळे आयुष्यभर लग्न करणार नाही लगान फेम ग्रेसी सिंग? आता दिसते अशी...

या कारणामुळे आयुष्यभर लग्न करणार नाही लगान फेम ग्रेसी सिंग? आता दिसते अशी...

googlenewsNext
ठळक मुद्देअजय देवगणसह 'गंगाजल' आणि संजय दत्तसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात ग्रेसीने काम केलं. हे दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले होते. सोबतच ग्रेसीने साकारलेल्या भूमिकाही तितक्याच हिट आणि लक्षवेधी ठरल्या.

ऑस्कर नॉमिनेटेड ‘लगान’ (Lagaan) या सुपरडुपर हिट सिनेमाच्या रिलीजला आज 20 वर्ष (20 Years of Lagaan) पूर्ण झालीत. 2001 साली आजच्याच दिवशी म्हणजे 15 जूनला ‘लगान’ हा सिनेमा रिलीज झाला होता.

'लगान' या सिनेमात गौरी या भूमिकेत ग्रेसी सिंगला पाहायला मिळाले होते. भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. 'लगान'मुळे गौरी साकारणाऱ्या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं.

अजय देवगणसह 'गंगाजल' आणि संजय दत्तसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात ग्रेसीने काम केलं. हे दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले होते. सोबतच ग्रेसीने साकारलेल्या भूमिकाही तितक्याच हिट आणि लक्षवेधी ठरल्या. याशिवाय तिने अनिल कपूर आणि प्रिती झिंटा स्टारर 'अरमान' या सिनेमात काम केलं होतं. मात्र या निवडक सिनेमांनंतर ग्रेसीच्या सिने करिअरची गाडी रुळावरुन घसरली.

एकामागून एक तिचे सिनेमा फ्लॉप झाले. तिला सिनेमात काम मिळणं कठीण झालं. मात्र करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला. ग्रेसीसाठी छोट्या पडद्यावर काम करणं ही बाब काही नवीव नाही. तिने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. १९९७ साली अमानत मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती. या मालिकेत काम करत असतानाच तिने 'लगान' सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट दिली आणि तिची लगानसाठी निवड झाली. यानंतर ग्रेसी सिनेमांमध्ये रमली. मात्र आता ग्रेसीला सिनेमात काम मिळेना. त्यामुळे तब्बल १३ वर्षांनंतर ग्रेसीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. 'संतोषी माता' मालिकेत तिने देवीची भूमिका साकारली. आपल्याला टिपिकल सासू-सूनांच्या भांडणावर आधारित मालिकांमध्ये रस नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. यासह तिने २००९ मध्ये डान्स अकॅडमीही सुरू केली होती. 

सध्या ग्रेसी आध्यात्माकडे वळली आहे. सोशल मीडियावर ब्रम्हकुमारी संदर्भातील सकारात्मक ऊर्जा देणारे सुविचारही ती शेअर करते. ब्रह्मकुमारी संस्थेशी ग्रेसी जोडली गेली आहे. ब्रम्हकुमारीची सदस्य बनल्यानंतर आता तिने लग्न करणार नसल्याचेही म्हटले आहे. तिचे कुटुंबिय तिला लग्न करण्यासाठी सांगतात मात्र लग्न करण्याचा तिचा कोणताही विचार नसल्याचेही तिने सांगितले आहे.

Web Title: lagaan fame gracy singh looks now, still unmarried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.