आशिकी, साजन, दिवाना, बाजीगर, 1942: अ लव्ह स्टोरी यांसारख्या अनेक चित्रपटांमधील कुमार सानूच्या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावले. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत कुमार सानूची मुलगी शॅनन ही बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.


 शॅननला बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसाठी गाणं गायचं आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार शॅनन म्हणाली, मला एका अभिनेत्रीचा आवाज बनायचा आहे. विशेष करुन दीपिका पादुकोण. ती माझी आवडती अभिनेत्री आहे. 


अमेरिकेत ‘अ लॉन्ग टाईम’ हे गाणे तिने गायले होते. हॉलिवूडचा पॉप स्टार जस्टीन बीबरचा सहकारी Poo Bea याने हे गाणे प्रोड्यूस केले होते. 2001 साली कुमार सानूने शॅननला दत्तक घेतले होते. आज हॉलिवूडमध्ये शॅननमुळेच लोक कुमार सानूला ओळखतात. एका मुलाखतीत ते याबद्दल बोलले होते
शॅनन के नावाने ओळखली जाणारी कुमार सानूच्या मुलीने आत्तापर्यंत अनेक गायकांसोबत गाणी गायली आहेत. कुमार सानूप्रमाणे शॅननही स्टाईलिश आहे. 2018 मध्ये तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.


कुमार सानू व शॅनन या बापलेकीने ‘इट्स मॅजिकल’हे गाणे एकत्र गायले होते. यातील हिंदी गाण्याला कुमार सानूने आवाज दिला होता. तर इंग्रजीतील गाणे शॅननने गायले होते. शॅननला जर संधी मिळाली तर तिला हिंदी गाणी गायलासुद्धा आवडतील असे ती मुलाखती दरम्यान म्हणाली होती. 

Web Title: kumar sanus daughter wants to sing for deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.