'..तर एपिसोड करणार नाही'; गोविंदामुळे कृष्णाने दिला 'कपिल शर्मा शो' करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 02:26 PM2021-09-05T14:26:02+5:302021-09-05T14:26:49+5:30

Krushna abhishek: यापूर्वीदेखील कपिल शर्मा शोमध्ये गोविंदा आणि त्यांची पत्नी आले होते. विशेष म्हणजे त्यावेळीदेखील कृष्णाने हा भाग करण्यास नकार दिला होता.

krushna abhishek refuses to perform with govinda on the kapil sharma show | '..तर एपिसोड करणार नाही'; गोविंदामुळे कृष्णाने दिला 'कपिल शर्मा शो' करण्यास नकार

'..तर एपिसोड करणार नाही'; गोविंदामुळे कृष्णाने दिला 'कपिल शर्मा शो' करण्यास नकार

Next
ठळक मुद्देगोविंदा या शोमध्ये येत असल्यामुळे कृष्णाने हा भाग करण्यास नकार दिला आहे.

अभिनेता गोविंदा Govinda आणि त्याच्या भाचा प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक Krushna Abhishek यांच्यातील वाद आता कोणापासूनही लपलेला नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या मामा-भाच्यामध्ये मतभेद आहेत. या दोघांमधील मतभेद आता टोकाला पोहोचले असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते एकमेकांच्या समोरही आले नाहीत असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे आता गोविंदामुळेच कृष्णाने 'द कपिल शर्मा शो'च्या The Kapil Sharma show अगामी भागाचं चित्रीकरण करण्यासही नकार दिला आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'द कपिल शर्मा' या शोच्या आगामी भागात अभिनेता गोविंदा त्याच्या पत्नीसोबत सुनीता अहुजासोबत सहभागी होणार आहे. मात्र, गोविंदा या शोमध्ये येत असल्यामुळे कृष्णाने हा भाग करण्यास नकार दिला आहे. 

सिध्दार्थला निरोप देताना 'हे' होते शहनाजचे अखेरचे शब्द
"गेल्या १५ दिवसांपासून मी चित्रपट आणि कपिल शर्मा शो साठी  रायपूर-मुंबई असा प्रवास करत आहे. मी कायमच या शो साठी माझ्या तारखा राखून ठेवत असतो. पण, या शोमध्ये ते (गोविंदा आणि सुनीता) येणार असल्यामुळे तो एपिसोड मला करायचा नाही. त्यामुळेच या एपिसोडसाठी मी कोणतीही तारीख अॅडजेस्ट केलेली नाही. कदाचित आम्हाला दोघांनाही एकत्र यायचं नाहीये", असं कृष्णा म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "हा एक कॉमेडी शो आहे. त्यामुळे कोणत्याही लहान गोष्टीवरुन मोठा वादही निर्माण होऊ शकतो. एखाद्या विनोदामुळे राग येऊ शकतो आणि उगाचच एखादा मोठा इश्शू निर्माण होऊ शकतो. आणि, मला कोणताही नवा इश्शू करायचा नाही. जर गोविंदाजी या मंचावर आले तर नक्कीच प्रेक्षकांना त्यांच्या आणि माझ्यातील वादाचे किस्से ऐकायची इच्छा होईल. त्यामुळे मी या एपिसोडमध्ये न येणं हाच उत्तम मार्ग आहे. कलाकार फार भावनिक असतात, त्यांनी काम केलंच पाहिजे. पण, असं काम नाही जेथे दोन जणांना एकमेकांचे चेहरेदेखील पाहायची इच्छा नाही. आमच्यातील वाद अजूनही मिटलेला नाही."

चिमुकल्या मायराचे रिअल लाइफ आई-वडील कोण माहितीये का?
 

दरम्यान, यापूर्वीदेखील कपिल शर्मा शोमध्ये गोविंदा आणि त्यांची पत्नी आले होते. विशेष म्हणजे त्यावेळीदेखील कृष्णाने हा भाग करण्यास नकार दिला होता.

Web Title: krushna abhishek refuses to perform with govinda on the kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app