krk claims karan johar has thrown ishaan khattar out of dharma production | करण जोहरने ईशान खट्टरला आधी दिला ब्रेक; आता केले आऊट...! केआरकेचा दावा !!
करण जोहरने ईशान खट्टरला आधी दिला ब्रेक; आता केले आऊट...! केआरकेचा दावा !!

ठळक मुद्देईशान खट्टर हा बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा आहे तर शाहिद कपूरचा भाऊ आहे. ‘धडक’ या चित्रपटातून करण जोहरनेच ईशानला लॉन्च केले होते.

वादग्रस्त ट्वीटसाठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता कमाल खान उर्फ केआरके याने पुन्हा एक नवा बॉम्बगोळा टाकला आहे. आपल्या नव्या ट्वीटमधून केआरकेने करण जोहरला लक्ष्य करत एक धक्कादायक बातमी दिली आहे. होय, करण जोहरने ‘धडक’ फेम अभिनेता ईशान खट्टर याला धर्मा प्रॉडक्शनमधून बाहेर काढल्याचा दावा केआरकेने केला आहे.
‘माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जोहरने ईशान खट्टरला धर्मातून बाहेर काढले आहे. कारण ईशान करणसोबत उद्धटपणे बोलला... आता करण ईशानसोबत कधीच कुठला चित्रपट करणार नाही,’ असे ट्वीट  केआरकेने केले आहे.

केआरकेच्या या ट्वीटने अनेकांना धक्का बसला आहे. पण कंगना राणौतची बहीण रंगोली हिने मात्र केआरकेच्या या दाव्याला आणखी बळ दिले आहे. करण जोहरसाठी असे काही करणे फार मोठी गोष्ट नाही, असे तिने म्हटले आहे. केवळ इतकेच नाही तर करण जोहर, ईशानवर काही अभिनेत्रींसोबत पॅचअप वा ब्रेकअप करण्यासाठी दबाव टाकत होता. करणने असे करण्यास नकार दिला आणि त्यामुळे संतापलेल्या करणने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला, असे अप्रत्यक्षपणे तिने म्हटले आहे. आता केआरकेच्या या दाव्यात किती तथ्य आहे, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण त्याच्या या दाव्याने आणखी एका नव्या वादाला जन्म घातला, इतके मात्र नक्की.

ईशान खट्टर हा बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा आहे तर शाहिद कपूरचा भाऊ आहे. ‘धडक’ या चित्रपटातून करण जोहरनेच ईशानला लॉन्च केले होते. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिलाही या चित्रपटातून त्याने ब्रेक दिला होता. मराठी चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती.

Web Title: krk claims karan johar has thrown ishaan khattar out of dharma production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.