ठळक मुद्देमॉडेल म्हणून करिअरची सुरूवात करणा-या कृतिने 2009 मध्ये ‘बोनी’ या तेलगू चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला.

अभिनेत्री कृति खरबंदा बॉलिवूडसोबतच साऊथ इंडस्ट्रीतही लोकप्रिय आहे. पण सध्या ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. होय, एका फोटोशूटदरम्यान कृति रिप्ड जीन्समध्ये दिसली आणि लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
या फोटोत कृतिने लाईट ब्ल्यू कलरची जीन्स आणि शर्ट कॅरी केला आहे. पण लोकांना तिचा हा अंदाज फार काही भावला नाही. विशेषत: तिची रिप्ड जीन्स पाहून लोकांनी नाही नाही त्या कमेंट्स दिल्या.


मग जीन्स घालण्यात अर्थच काय, असे एका युजरने हा फोटो पाहून लिहिले. अन्य एका युजरने ‘पाहा, किती ही गरिबी,’ अशी प्रतिक्रिया दिली. ‘इतका पैसा कमवून काय फायदा,’ असे एकाने लिहिले. एका जणाने तर कृतिला चक्क भिकारी म्हटले.


मॉडेल म्हणून करिअरची सुरूवात करणा-या कृतिने 2009 मध्ये ‘बोनी’ या तेलगू चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. ‘राज - रिबूट’ या चिपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शादी में जरूर आना, यमला पगला दीवाना फिर से, गेस्ट इन लंडन अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात कृति झळकली आहे. लवकरच ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटात ती दिसणार आहे. याशिवाय ‘पागलपंती’ आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘चेहरे’ या चित्रपटांतही तिची वर्णी लागली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kriti kharbanda ripped jeans users get trolled and tag bhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.