Kolkata police arrest actor-professor Sudipto Chatterjee on charges of rape | बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शकाला झाली अटक, कित्येक महिन्यांपासून करत होता दुष्कर्म

बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शकाला झाली अटक, कित्येक महिन्यांपासून करत होता दुष्कर्म

कोलकातातील प्रसिद्ध दिग्दर्शक व रंगभूमीवरील कलाकार सुदीप्तो चटर्जीवर गंभीर आरोप करण्यात आली आहे. त्याच्याच नाट्यगटातील एका विद्यार्थ्याने बलात्काराचा आरोप केला होता. या विद्यार्थीनींने आरोप केला की, सुदीप्तोने कित्येक महिन्यांपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांनी दिली आहे. यासोबतच या प्रकरणी आणखीन काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सुदीप्तोने त्याचे आरोप मान्य केले आहेत आणि या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. 


पीडित व्यक्तीने तिच्यासोबत घडलेल्या वाईट गोष्ट सांगण्यासाठी सोशल नेटवर्क साईटची मदत घेतली. त्यावेळी हे प्रकरण समोर आले.

पीडितीने सोशल मीडियावर सांगितले की, “सुदीप्तोने अभिनय शिकवण्याच्या बहाण्याने माझ्यावर वारंवार बलात्कार केला. मी अनेकदा त्याच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने मला माझे करिअर संपवून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मी शांत बसले होते.” 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुदिप्तोच्या आणखी दोन विद्यार्थांनींनी त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. परंतु त्या प्रकरणावर पोलिसांची चौकशी सुरु आहे. पोलीस चौकशीदरम्यान सुदिप्तोने बलात्काराचा आरोप फेटाळून लावला. मात्र त्याने त्या तरुणीबरोबर शारिरीक संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे. त्याच्या मते दोघांच्या संमतीने हे संबंध प्रस्तापित झाले होते. परंतु सुदिप्तोने पीडित तरुणीला केलेल्या काही मोबाईल मेसेजच्या आधारावर पोलिसांना त्याला अटक केली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kolkata police arrest actor-professor Sudipto Chatterjee on charges of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.