मराठी सिनेइंडस्ट्री असो किंवा बॉलिवूड हल्ली सर्वच कलाकार फिटनेसच्या बाबतीत जागरूक असल्याचं पहायला मिळतं. त्यासाठी ते डाएट व वर्कआऊट करताना दिसतात. त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या फिटनेसबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. तसेच बॉलिवूडचा किंग खान शाहरूखदेखील फिटनेसबद्दल खूप जागरूक असतो. वयाच्या ५४ वर्षीदेखील तो तरूण दिसतो. 

शाहरूख खानसारखे फिट राहायचे असेल तर त्याच्या फिटनेसचं रहस्य जाणून घ्या. वर्कआऊट्सबरोबर शाहरूख आहारालाही खूप महत्त्व देतो. सकाळच्या नाश्त्याला अंड्याचा पांढरा भाग, ब्राऊन ब्रेड आणि काॅफी घेतो. 


शाहरूखचे दुपारचं जेवणदेखील मर्यादीत असते. त्यात फ्राय केलेल्या भाज्या किंवा चिकन किंवा मासे असतात. चिकन सॅण्डविच त्याला आवडतं. सोबत सॅलडही असतं. स्नॅक्स म्हणून तो पुन्हा एकदा अंड्याच्या पांढऱ्या भागाचं ऑमलेट किंवा प्रोटिन पावडर घेतो. प्रोटिन्स शेक पितो.


शाहरुख खानचे वर्कआऊट मराठमोळा मुलगा प्रशांत सावत करून घेतो. गेल्या वीस वर्षांपासून तो शाहरूखच्या फिटनेसकडे लक्ष देतो.


शाहरुखनं वर्कआऊट करूनच सिक्स पॅक अॅब्स आणि 8 पॅक अॅब्स कमावलेचे आपण चित्रपटातून पाहिलेच आहेत. तो आठवड्यात ५ दिवस जिममध्ये जातो. रोज १ तास २० मिनिटं व्यायाम करतो. तो पाॅवर प्ले टेक्निक्स आणि १० मिनिटं कार्डिओ करतो.

त्याच्या ट्रेनरनं त्याच्यासाठी वेगळे डंबेल्स आणून दिले. ट्रेनर सांगेल त्याप्रमाणे शाहरुख वर्कआऊट बदलतोच, पण डाएटमध्येही बदल करत राहतो.

Web Title: King Khan Shahrukh also looks fit at the age of ५४, this is his fitness fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.