‘मोहब्बतें’ सिनेमातून किम शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमा जबरदस्त हिट ठरला होता. किमने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 18 चित्रपट केलेत. पण ‘मोहब्बतें’मधील तिची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय झाली.

यशराजच्या चित्रपटातून डेब्यू करणारी किम 2008 मध्ये प्रदर्शित ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. यानंतर 2010 मध्ये ‘यगम’ या तेलगू चित्रपटात ती झळकली. पण तेव्हापासून तिच्याकडे एकही सिनेमा नाही. ‘मोहब्बतें’ फेम किम शर्मा दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे.  

मध्यंतरी किम तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती. अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतचे तिचे अफेअर चांगलेच गाजले होते. पण हे अफेअर फार काळ टिकले नाही. दोघांचे ब्रेकअप झाले. 

सर्वप्रथम क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत तिच्या अफेअरची चर्चा झाली. यानंतर स्पॅनिश बॉयफ्रेन्ड कार्लोस मार्टिनला तिने डेट केले. कार्लोस व किम दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच कळले नाही. अचानक किमने अली पुंजानीसोबत लग्न केले. केवळ एक आठवड्याच्या डेटींगनंतर किम आणि अली यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. यानंतर किमने मुंबईसोडून केन्याला तिच्या पतीसोबत राहायला गेली होती़ पण 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

 

Web Title: Kim sharma far away from the bollywood movie gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.