Kiara Advani wants that Hrithik Roshan and Aditya Roy Kapur should not take bath | ...म्हणून हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूरने कधीच आंघोळ करू नये, कियाराची आहे अशी इच्छा!

...म्हणून हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूरने कधीच आंघोळ करू नये, कियाराची आहे अशी इच्छा!

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) नुकतीच नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा (No Filter Neha)' या चॅटमध्ये दिसली होती. नेहासोबत बातचीत करताना कियाराने तिच्या मनातील अनेक गोष्टी शेअर केल्या. कियाराने यावेळी तिच्या लाइफ पार्टनरमध्ये काय-काय गुण असावेत हेही सांगितलं. सोबतच तिने एका प्रश्नाला असं मजेदाक उत्तर दिलं की, वाचून सगळे अवाक् झालेत. तिने इच्छा व्यक्त केली की, हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूरने कधीच आंघोळ करू नये. यावर तिचं मत आहे की, ते तसेच चांगले दिसतात आणि तिला ते खूप आवडतात. या बातचीतचा व्हिडीओ नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नेहा धुपियाने कियाराला एक काल्पनिक स्थिती दिली. कियाराला नेहाने विचारले की, एका घरात अनेक सेलिब्रिटी अडकून पडले आहेत असं समज. अशात सर्वांचं मनोरंजन कोण करेल? यावर कियाराने लगेच अक्षय कुमारचं नाव घेतलं. त्यानंतर नेहाने विचारले की, असा कोण सेलिब्रिटी असेल ज्याने आंघोळ करू नये? यावर कियारा म्हणाली की, 'मला वाटतं हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूरने आंघोळ करू नये. ते असेही कूल दिसतात'. (कियारा अडवाणीला लाइफ पार्टनरमध्ये हवे आहेत इतके सारे गुण, खरंच कुठे मिळेल असा मुलगा?)

सोबतच या शोमध्ये कियाराचा एक बबली अंदाज बघायला मिळाला त्यामुळे तिच्या फॅन्सना हा व्हिडीओ फारच आवडला आहे. कियाराच्या या अंदाजाचं नेहा धुपियाही कौतुक करताना दिसली आहे. 

कसा लाइफ पार्टनर हवा?

कियाराने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सांगितलं की, तिच्या पार्टनरमध्ये काय काय गुण असले पाहिजे. ती म्हणाली की, त्याच्यात जेनिफर लॉरेन्सारखा हजरजबाबीपणा असला पाहिजे. तो दिसायला हृतिक रोशनसारखा असावा आणि त्याचा डिसिप्लीन-स्टॅमिना अक्षय कुमारसारखा असावा. इतकेच नाही तर कियाराने आणखीही अनेक गोष्टी सांगितल्या. 

कियाराने हेही सांगितलं की, तिचा पार्टनर श्रीमंत असावा. नुसताच श्रीमंत नसावा तर त्याच्याकडे अंबानीं इतका पैसा असावा. आणि सोबतच फरहान अख्तर व आयुष्मान खुराणासारखं टॅलेंटही त्याच्यात असावं.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kiara Advani wants that Hrithik Roshan and Aditya Roy Kapur should not take bath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.