ठळक मुद्देकियाराने काही महिन्यांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचा लहानपणीचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत डोक्याला टोपरे घातलेली क्यूट कियारा आपल्याला पाहायला मिळत आहे.

कियारा आडवाणीने खूपच कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. फग्ली या चित्रपटापासून कियाराने करियरला सुरुवात केली. त्यानंतर मशिन या चित्रपटात ती झळकली. या दोन्ही चित्रपटामुळे तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. लस्ट स्टोरीमुळे प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटातील कियाराची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या चित्रपटातील तिच्या लूक्सची देखील चांगलीच चर्चा होत आहे.

कियाराने काही महिन्यांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचा लहानपणीचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत डोक्याला टोपरे घातलेली क्यूट कियारा आपल्याला पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून तू लहानपणी देखील तितकीच छान दिसत होतीस असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. या फोटोला लाखोहून अधिक लोकांनी लाईक केले असून तिच्या फॅन्सनी भरभरून या फोटोवर कमेंट केल्या आहेत. 

कियारा आडवाणीचे खरे नाव कियारा नसून आलिया असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. तिने तिचे हे नाव इंडस्ट्रीत येण्यासाठी बदलले. पण तिने हे नाव बदलण्यामागे एक खास कारण आहे आणि विशेष म्हणजे हे नाव बदलण्यामागे बॉलिवूडमधील एक अभिनेता आणि अभिनेत्री आहे. कियाराने याविषयी मुलाखतीत सांगितले होते. 

कियारा सांगते, माझे खरे नाव आलिया आहे. पण आलिया भट ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्याने सलमान खानने मला नाव बदलण्याचे सुचवले. सलमानचे म्हणणे होते की, एकाच नावाच्या दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असू शकत नाहीत. त्याने मला नाव बदलायला सुचवले असले तरी नवीन नाव काय ठेवायचे हे मी ठरवले. कियारा हे नाव मला आवडत असल्याने मी कियारा या नावाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. आता तर माझे आई-वडील देखील मला आलिया नव्हे तर कियारा या नावाने हाक मारू लागले आहेत.

Web Title: Kiara advani Childhood picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.