कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूडचे सेलिब्रेटीही अडकू लागले आहेत. नुकतीच अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता तिने एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना एक मेसेज दिला आहे.

नुकतीच अभिनेत्री कतरिना कैफची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याबद्दल सांगितले होते. सध्या ती घरी आयसोलेट राहून स्वत:ची काळजी घेते आहे. दरम्यान, कतरिनाने एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. त्या बरोबर तिने एक मेसेजही दिला आहे.


कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. वेळ आणि संयम असे तिने कॅप्शन दिले आहे. यातून तिला सांगायचे आहे की कोरानाच्या विषाणूशी लढा देण्यासाठी आपल्याला वेळ आणि धैर्याची आवश्यकता आहे.


कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तिचा आगामी ‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण कतरिनाने तिचे शूटिंग आधीच केले होते आणि उर्वरित शूट एप्रिलच्या शेवटी आहे. सध्या सलमान खान त्याचे  शूटिंग पूर्ण करत आहे. त्यामुळेच 'टायगर ३' चित्रपटाच्या शूटिंगवर याचा काहीही परिणाम होणार नाही. 


'सूर्यवंशी' चित्रपटाची रिलीज डेट कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात कतरिना कैफसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Katrina Kaif's condition due to corona, this message was shared by sharing photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.