कतरीना कैफने केले आत्तापर्यंतचे सर्वात सेक्सी फोटोशूट, कधीही पाहिले नसतील असे फोटो!!  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 02:59 PM2019-11-08T14:59:57+5:302019-11-08T15:01:40+5:30

सध्या कतरीनाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.  

katrina kaif turns up the heat with the sexiest photoshoot with vogue | कतरीना कैफने केले आत्तापर्यंतचे सर्वात सेक्सी फोटोशूट, कधीही पाहिले नसतील असे फोटो!!  

कतरीना कैफने केले आत्तापर्यंतचे सर्वात सेक्सी फोटोशूट, कधीही पाहिले नसतील असे फोटो!!  

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.  

कतरीना कैफ लवकरच अक्षय कुमार स्टारर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे. पडद्यावर कतरीनाचा जलवा काही और असतो. चाहते तिच्या प्रेमात पडतात. पण कॅटचे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. होय, कतरीनाने नुकतेच वोग इंडिया या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. हे कतरीनाचे आत्तापर्यंतचे सर्वात सेक्सी फोटोशूट आहे, असे म्हटले तरी चालेल. या फोटोत कतरीना कमालीची सुंदर दिसतेय.


नुकताच वोग इंडियाने कतरीनाला ‘रिस्क टेकर आॅफ द इअर’ या पुरस्काराने गौरविले. ‘झिरो’ आणि ‘भारत’ या चित्रपटातील तिच्या भूमिका पाहता तिला हा पुरस्कार देण्यात आला. आता वोग इंडियासाठी कतरीनाने फोटोशूट केले आहे.

कतरीनाने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत. साहजिकच सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.  


तुम्हाला ठाऊक आहेच की, सध्या कतरीना व विकी कौशलच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत.  हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही महिन्यानंतर विकी कतरीनात गुंतल्याचे मानले जात आहे. दोघांनीही वेळोवेळी या बातम्या नाकारल्या. पण अलीकडे असे काही झाले की, पुन्हा एकदा विकी व कतरीनाच्या रोमान्सच्या चर्चांना ऊत आला होता.

अलीकडे विकी व कतरीना दोघेही एका दिवाळी पार्टीत दिसले होते. पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले. पण बाहेर मीडियाला पाहताच दोघांनीही मार्ग बदलला होता.


पापाराझींना बघताच कतरीना अक्षरश: भींतीआड लपली.  दुसरीकडे  विकी कतरीनाला इग्नोर करून एकटा कारमध्ये बसून निघून गेला. अर्थात पापाराझींच्या नजरेतून भींतीआड लपलेल्या कतरीनाचा लेहंगा लपला नाही. कतरीना मीडियाला पाहून लपली, हे लगेच सर्वांना कळून आले. पापाराझींनी हा सगळा सीन कॅमे-यात कैद केला होता.

Web Title: katrina kaif turns up the heat with the sexiest photoshoot with vogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.