ठळक मुद्देकतरीना सध्या ‘सूर्यवंशी’ या सिनेमात बिझी आहे. यात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.

सलमान खान आणि कतरीना कैफ एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. ‘मैंने प्यार क्यों किया’ हा दोघांचा पहिला एकत्र असा सिनेमा. यानंतर दोघांनीही अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. ‘युवराज’ या चित्रपटाच्या सेटवरून दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. अर्थात कतरीना व सलमानने ही गोष्ट कधीही कबूल केली नाही. पण अनेक ठिकाणी सलमानच्या डोळ्यांतील कतरीनाबद्दलचे प्रेम दिसले. मात्र कतरीना रणबीरच्या प्रेमात पडली. अर्थात पुढे रणबीरसोबत कॅटचे ब्रेकअप झाले. यानंतर  कतरीना पुन्हा सलमानच्या जवळ आली. आजही कतरीनाला गरज असेल तेव्हा सलमान तिच्या मदतीला धावतो. पण दोघांत नेमके काय सुरु आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही.  अलीकडे कतरीनाने एका ताज्या मुलाखतीत तिच्या व सलमानच्या नात्यावर प्रकाश टाकला.

सलमान व तुझ्यात नेमके काय नाते आहे, असा प्रश्न तिला केला गेला. यावर आमच्यात केवळ मैत्रीचे नाते आहे. ‘ती’ गोष्ट आम्ही कधीच विसरलो आहोत. आता आमच्यात केवळ मैत्रीचे नाते आहे,असे ती म्हणाली.

गेली 16 वर्षे मी व सलमान सोबत आहोत. या 16 वर्षांत आमच्यात मैत्रीशिवाय काहीही नाही. आमच्यात खरी मैत्री आहे.  सलमान एक चांगली व्यक्ती आहे. गरजूंना तो नेहमीच मदत करतो. मी अडचणीत असतानाही अनेकदा मदतीसाठी तो धावून आला. आम्ही अनेकदा एकमेकांच्या संपर्कात नसतो. पण गरज पडली तेव्हा तो हजर होतो, असेही तिने सांगितले.


कतरीना सध्या ‘सूर्यवंशी’ या सिनेमात बिझी आहे. यात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तर सलमान खान ‘दबंग 3’ सिनेमाचे शूटींग करतोय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: katrina kaif talk on link up rumours with salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.