katrina kaif share first look of akshay kumar as sooryavanshi photo viral on instagram | कतरिना कैफने शेअर केली सूर्यवंशी सिनेमाची झलक
कतरिना कैफने शेअर केली सूर्यवंशी सिनेमाची झलक

कतरिना कैफ लवकरच अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. कतरिनाने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने अक्षय कुमार, करण जोहर, रोहित शेट्टी यांना टॅग केले आहे. कॅटने शेअर केलेल्या फोटोमध्ये पोलिसांच्या वर्दी आहे ज्यावर वीर सुर्यवंशी असे लिहिलेले आहे. या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव वीर सुर्यवंशी आहे.  


‘सुर्यवंशी’ या सिनेमात अक्षय कुमार एटीएफ अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. हा सिनेमा पुढच्या वर्षी 27 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘सिम्बा’प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपटही एका साऊथच्या सिनेमाचा रिमेक असल्याचे मानले गेले होते. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा  होती. ही बातमी आली आणि अनेकांचा चटकन विश्वास बसला. कारण रोहितने याआधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता.


‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’ नावाचा चित्रपट याआधी बनला आहे.


Web Title: katrina kaif share first look of akshay kumar as sooryavanshi photo viral on instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.