कतरीना कैफने ‘थाळी’ नाही ‘चाळणी’ वाजवली, नेटक-यांनी अशी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 02:22 PM2020-03-23T14:22:32+5:302020-03-23T14:23:58+5:30

पाहा व्हिडीओ

katrina kaif did something wrong on janta curfew day getting troll on social media-ram | कतरीना कैफने ‘थाळी’ नाही ‘चाळणी’ वाजवली, नेटक-यांनी अशी घेतली मजा

कतरीना कैफने ‘थाळी’ नाही ‘चाळणी’ वाजवली, नेटक-यांनी अशी घेतली मजा

googlenewsNext
ठळक मुद्देकतरीनाचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि मग काय, लोकांनी यावरून तिची मजा घेणे सुरु केले.

सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढतोय. भारतात कोरोना बाधितांची संख्या 390 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरस नावाच्या छुप्या शत्रूला हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता लोकांनी थाळ्या, टाळ्या वाजवून कोरोनाशी लढणारे डॉक्टर,नर्स, पोलिस अशा सर्वांचे आभार मानण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनाला देशभर मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही काल 5 च्या ठोक्याला 5 मिनिटांसाठी टाळ्या, थाळी वाजवत कोरोनाविरोधात लढणा-यांचे आभार मानलेत. बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ ही सुद्धा याला अपवाद नव्हती.

कतरीनानेही थाळी वाजवत कोरोनाशी लढणा-या फायटर्सप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कतरीनाने याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. पण हे काय? कतरीनाचा हा व्हिडीओ पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. होय, व्हिडीओत थाळी वाजवल्याचा जोरदार आवाज येतोय. पण कतरीनाचे म्हणाल तर ती अगदी हळूहळू थाळी वाजवतेय. केवळ इतकेच नाही तर थाळीच्या जागी ती ‘छलनी’ वाजवताना दिसतेय.

कतरीनाचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि मग काय, लोकांनी यावरून तिची मजा घेणे सुरु केले. ‘दीदी इतनी मेहनत करने की भी क्या जरूरत थी,’ असे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने, ‘हे पाहिल्यानंतर कोरोना चीन परत जातोय,’ अशी मजेशीर कमेंट एकाने दिली. एका युजरने तर याहीपेक्षा भारी कमेंट दिली. ‘कतरीनाने हे कामही आपल्या अ‍ॅक्टिंगसारखे केले... संथ...’, असे या युजरने लिहिले.

Web Title: katrina kaif did something wrong on janta curfew day getting troll on social media-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.