कार्तिक आर्यन की तो निकल पडी...! एकापाठोपाठ एक रिलीज होणार पाच सिनेमे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 08:00 AM2019-10-01T08:00:00+5:302019-10-01T08:00:02+5:30

अक्षयप्रमाणेच कार्तिकही एका पाठोपाठ एक अशा पाच चित्रपटांत दिसणार आहे.

kartik aaryan is working like akshay kumar will be seen in 5 films soon including dostana 2 love aaj kal gangoo bai pati patni aur wo bhul bhulaiyaa2 | कार्तिक आर्यन की तो निकल पडी...! एकापाठोपाठ एक रिलीज होणार पाच सिनेमे!!

कार्तिक आर्यन की तो निकल पडी...! एकापाठोपाठ एक रिलीज होणार पाच सिनेमे!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटातही कार्तिकची वर्णी लागली आहे. 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अ‍ॅक्शनसोबतच एकापाठोपाठ एक असे चित्रपट देणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच अक्षयच्या सिनेमांची चाहत्यांना फार प्रतीक्षा करावी लागत नाही. आता बॉलिवूडचा आणखी एक अभिनेता अक्षयच्या पावलावर पाऊल ठेवू पाहतोय. होय, या अभिनेत्याचे नाव आर्ह कार्तिक आर्यन. अक्षयप्रमाणेच कार्तिकही एका पाठोपाठ एक अशा पाच चित्रपटांत दिसणार आहे.


नुकताच कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. यात तो एक बोर्ड घेऊन बसलेला दिसतोय. या बोर्डवर ‘दोस्ताना 2’ असे लिहिलेले आहे. म्हणजेच, करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात कार्तिकची वर्णी लागली आहे.


‘दोस्ताना 2’ शिवाय कार्तिक अनेक चित्रपटांत बिझी आहे. यातलाच एक म्हणजे, ‘गंगुबाई’. होय, संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटात आलिया भटच्या अपोझिट कार्तिक आर्यन दिसणार आहे. आलियाच्या प्रियकराची भूमिका तो यात साकारणार आहे. अर्थात अद्याप या चित्रपटाची घोषणा झालेली नाही.
‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात कार्तिक आर्यन अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.


‘लव आजकल’चा सीक्वल अर्थात ‘लव आजकल 2’ या चित्रपटात कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये आहे. यात तो सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झालेय. ‘लव आजकल 2’ हा सिनेमा 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान व दीपिका पादुकोण स्टारर ‘लव आजकल’चा सीक्वल आहे.
‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटातही कार्तिकची वर्णी लागली आहे. 

Web Title: kartik aaryan is working like akshay kumar will be seen in 5 films soon including dostana 2 love aaj kal gangoo bai pati patni aur wo bhul bhulaiyaa2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.