दोस्ताना 2 च्या वादानंतर कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच सोशल मीडियावर केली पोस्ट, क्षणात झाली व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:17 PM2021-04-24T16:17:37+5:302021-04-24T16:19:30+5:30

कार्तिक या सगळ्यावर काय उत्तर देतो याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

Kartik Aaryan shares first post since Dostana 2 exit | दोस्ताना 2 च्या वादानंतर कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच सोशल मीडियावर केली पोस्ट, क्षणात झाली व्हायरल

दोस्ताना 2 च्या वादानंतर कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच सोशल मीडियावर केली पोस्ट, क्षणात झाली व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देकरण जोहरने कार्तिक आर्यनला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केलं आहे. पण कार्तिकने असे काहीही केलेेले नाहीये. तो आजही करणला सोशल मीडियावर फॉलो करत आहे.

करण जोहरचा 'दोस्ताना 2'  हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. करणने कार्तिक आर्यनला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यासाठी धर्मा प्रोडक्शनने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. ज्यामध्ये असे लिहिले होते की, काही कारणांमुळे दोस्ताना 2 ची कास्टिंग पुन्हा होत आहे. एवढेच नाही तर करण जोहरनेकार्तिक आर्यनला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केलं आहे. पण कार्तिकने असे काहीही केलेेले नाहीये. तो आजही करणला सोशल मीडियावर फॉलो करत आहे. 

कार्तिक या सगळ्यावर काय उत्तर देतो याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. पण त्याने या सगळ्यावर मौन राखणेच पसंत केले आहे. कार्तिकने या प्रकरणानंतर पहिल्यांदाच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

कार्तिकने पोस्ट केलेल्या फोटोत त्याचा वेगळाच लूक दिसत असून कार्तिक या फोटोत सुपरहिरो सारखा दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. कार्तिकने कित्येक दिवसानंतर पोस्ट केल्यामुळे त्याचे चाहते प्रचंड खूश असल्याचे देखील ते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. कार्तिकचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ एका दिवसांत 10 लाख 70 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. 

मीडियातील रिपोर्टनुसार, करणने हे करण्यामागील कारण म्हणजे कार्तिक आर्यनचे अनप्रोफेशनल वागणं. असं म्हणतात की, कार्तिकने चित्रपटाचे सुमारे 20 दिवस शूटिंग पूर्ण केलं होतं. पण त्यानंतर अचानक कार्तिकला चित्रपटाचा दुसरा भाग आवडला नाही. त्याने चित्रपटात बदल करण्याची मागणी केली पण करणला हे अजिबात मान्य नव्हते.

Web Title: Kartik Aaryan shares first post since Dostana 2 exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.