kartik aaryan out from dostana 2 blacklisted in karan johar dharma production | कार्तिक आर्यनचा उद्धटपणा आला अंगाशी, करण जोहरने 'दोस्ताना २'मधून दाखवला बाहेरचा रस्ता

कार्तिक आर्यनचा उद्धटपणा आला अंगाशी, करण जोहरने 'दोस्ताना २'मधून दाखवला बाहेरचा रस्ता

कार्तिक आर्यनने 2011 साली ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आकाशवाणी, कांची द अनब्रेकेबल, प्यार का पंचनामा 2, गेस्ट इन लंडन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमाने तो ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला. कार्तिक आर्यनचेकरण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम करण्याचे स्वप्न होते. त्याला ती संधी 'दोस्ताना 2'सिनेमाच्या माध्यमातून  मिळाली. पण कार्तिकचे हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याचे करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शन्सशी असलेला दोस्ताना तुटला. 

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, करण जोहरने कार्तिक आर्यनला 'दोस्तना 2' मधून काढून टाकले आहे आणि भविष्यात कार्तिक आर्यनबरोबर कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिक आर्यनच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे आणि सिनेमाच्या स्क्रिप्टला घेऊन असलेल्या मतभेदमुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे कळतंय. 

रिपोर्टनुसार "दीड वर्षानंतर कार्तिक आर्यनला समजले की 'दोस्तना 2' च्या स्क्रिप्टमध्ये त्रुटी आहे आणि त्यामध्ये त्याला बदल हवा आहे? कार्तिकच्या वागण्यामुळे आता धर्मा प्रॉडक्शनने त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. 'दोस्ताना 2' फक्त 20 दिवसांचं शूटिंग झालं होते. गेल्यावर्षी कोरोना व्हायरसमुळे सिनेमाचे शूटिंग होऊ शकलं नाही. मात्र आता सिनेमातून करण जोहरने कार्तिकलाच काढून टाकलं आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kartik aaryan out from dostana 2 blacklisted in karan johar dharma production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.