OMG! कार्तिक आर्यनच्या प्रेमात वेडी झाली चाहती, खुल्लमखुल्ला केले असे काही 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:46 AM2019-09-29T11:46:07+5:302019-09-29T11:46:34+5:30

कार्तिकच्या व्हिडीओवर चाहत्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्यात. पण सारा अली खानचे टेन्शन मात्र वाढले.

kartik aaryan fan propose him outside his home | OMG! कार्तिक आर्यनच्या प्रेमात वेडी झाली चाहती, खुल्लमखुल्ला केले असे काही 

OMG! कार्तिक आर्यनच्या प्रेमात वेडी झाली चाहती, खुल्लमखुल्ला केले असे काही 

googlenewsNext
ठळक मुद्दे नुकतेच कार्तिकने ‘पति पत्नी और वो’या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले.

अभिनेता कार्तिक आर्यन सारा आली खानसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.  कार्तिकच्या प्रेमात सारा आकंठ बुडालीय. कालपर्यंत हा सगळा ‘चोरीचा मामला  होता. पण नुकत्याच झालेल्या साराच्या वाढदिवशी या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले.  सारासोबतचा फोटो शेअर करत कार्तिकने प्रेमाची कबुली दिली. आता तर स्थिती ही आहे की, दोघांना क्षणभरही दुरावा सहन होत नाही. त्याचमुळे कार्तिक लखनौमध्ये शूटींग करत असताना सारा एकदा नाही तर दोनदा त्याला भेटायला लखनौला गेली. कार्तिकचे म्हणाल तर तोही सारापासून फार काळ दूर राहू शकत नाही. पण हे काय, कार्तिकला सारानेनाही तर दुसरीनेच प्रपोज केले. ते देखील खुल्लम खुल्ला.


होय, कार्तिकचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यनला एक मुलगी सर्वांसमोर प्रपोज करताना दिसत आहे. कार्तिकला भेटण्यासाठी या मुलीने त्याच्या घरासमोर ठाण मांडले. अगदी 2 तास ती त्याच्यासाठी ताटकळत बसली. याचदरम्यान कार्तिक घराबाहेर पडला आणि त्याची नजर थेट रेड-यॅलो ड्रेसमध्ये असलेल्या तिच्यावर पडली. ती दोन तासांपासून वाट पाहतेय, म्हटल्यावर कार्तिक तिच्याशी बोलला. ‘इतका वेळ वाट का पाहतेस?’, असे कार्तिकने तिला विचारले. मग काय, ती लगेच गुडघ्यावर खाली बसली आणि तिने कार्तिकला सर्वांसमोर प्रपोज केले. तिचे हे अनपेक्षित वागणे बघून कार्तिकही थक्क झाला. त्याने हळूच तिला तिचा हात पकडून तिला उभे केले आणि तिच्यासोबत एक मस्त सेल्फी घेतला.
या व्हिडीओवर चाहत्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्यात. पण सारा अली खानचे टेन्शन मात्र  वाढले.

 नुकतेच कार्तिकने ‘पति पत्नी और वो’या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. या सिनेमात त्याच्यासोबत भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय ‘लव्ह आज कल’च्या सिक्वेलमध्ये तो सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

 

Web Title: kartik aaryan fan propose him outside his home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.