ठळक मुद्देलोकमत स्टाईल अवार्ड सोहळ्यात रणवीर सिंगने सारा व कार्तिकची भेट घालून दिली होती.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे रिलेशनशिप सध्या कुणापासूनही लपलेले नाही.  कार्तिकच्या प्रेमात सारा आकंठ बुडालीय. कालपर्यंत हा सगळा ‘चोरीचा मामला’ होता. पण नुकत्याच झालेल्या साराच्या वाढदिवशी या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले.  सारासोबतचा फोटो शेअर करत कार्तिकने खुल्लम खुल्ला प्रेमाची कबुली दिली. आता तर स्थिती ही आहे की, दोघांना क्षणभरही दुरावा सहन होत नाही. त्याचमुळे कार्तिक लखनौमध्ये शूटींग करत असताना सारा एकदा नाही तर दोनदा त्याला भेटायला लखनौला गेली. कार्तिकचे म्हणाल तर तोही सारापासून फार काळ दूर राहू शकत नाही. अगदी तिच्यासाठी काम बाजूला ठेवण्याचीही त्याची तयारी आहे.

विश्वास बसणार नाही, पण सारासाठी कार्तिकने एक कमिटमेंट मोडली. होय, नुकतेच बालीमध्ये श्रीदेवींच्या एका बेस्ट फ्रेन्डच्या मुलाचे लग्न होते. या लग्नात कार्तिक व कतरीना कैफ दोघेही एकत्र परफॉर्म करणार होते. कार्तिकने आधी यासाठी होकार दिला. पण ऐनवेळी त्याने माघार घेतली. सूत्रांचे मानाल तर हा सगळा खटाटोप एकट्या सारासाठी होता. सरासोबत राहता यावे, तिला वेळ देता यावा म्हणून कार्तिकने या लग्नाला जाण्यास नकार दिला. 

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने कार्तिकसोबत कॉफी डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून या दोघांची चर्चा सुरू झाली.

त्यानंतर लोकमत स्टाईल अवार्ड सोहळ्यात रणवीर सिंगने सारा व कार्तिकची भेट घालून दिली होती. यानंतर कार्तिक व सारा ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेत आणि दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले.
 कार्तिक लवकरच ‘पति पत्नी और वो’चे चित्रीकरण झाल्यानंतर ‘भूल भुलैया’च्या रिमेकसाठी काम करणार आहे. तर सारा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवनसह झळकणार आहे.


Web Title: kartik aaryan calls off commitment to honour date with sara ali khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.