कार्तिक आर्यनच्या न्यू लूकवर नेटिझन्स झाले फिदा, होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:34 PM2020-05-05T12:34:51+5:302020-05-05T12:35:30+5:30

कार्तिक आर्यनचा नवा लूक त्याच्या चाहत्यांना खूप भावतो आहे.

Karthik Aryan's new look has caught the attention of netizens TJL | कार्तिक आर्यनच्या न्यू लूकवर नेटिझन्स झाले फिदा, होतोय कमेंट्सचा वर्षाव

कार्तिक आर्यनच्या न्यू लूकवर नेटिझन्स झाले फिदा, होतोय कमेंट्सचा वर्षाव

googlenewsNext

देशात लॉकडाउनमुळे सध्या कोणतेच शूटिंग होत नाही आहे. तरीदेखील बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन त्याचा हिट चॅट शो कोकी पूछेगामध्ये व्यग्र आहे. तो या शोसाठी स्टडी करतो आणि नंतर क्लिप एडिट करणे व रेडरिंग करण्याच्या कामात बिझी असतो. नुकत्याच त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्यो तो व्यायामाबद्दल बोलताना दिसतो आहे. कार्तिक आर्यनदेखील खूप वर्कआऊट करतो आहे आणि टोंड बॉडी बनवित आहे, असं दिसतंय.

कार्तिक आर्यनने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो चाहत्यांना सांगतो आहे की तो बॉलिवूडमधील पहिला व्हर्चुअल कॉन्सर्टचा हिस्सा असणार आहे. के आय फॉर इंडियासाठी. लोकांना देशातील महारोगराईशी लढण्यासाठी दान करण्याची विनंती करतो.

मात्र त्याच्या या व्हिडिओतून नेटिजन्सचे कार्तिकच्या लूकवरून नजरच हटत नव्हती. यात तो एका स्लीवलेस टीमध्ये दिसतो आहे. काही आठवड्यांपूर्वी त्याने दाढी पासून मुक्तता हवी आहे आणि त्याने चाहत्याने मदत करण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी त्याच्या काही चाहत्यांनी सांगितले होते की दाढीतही छान दिसतो आणि क्लीन शेवमध्येही. 

त्याच्या काही चाहत्यांनी त्याची तुलना नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सीरिज मनी हिस्टमधील प्रोफेसरसोबत केली. 

कार्तिक आर्यनचा वर्कआऊट कदाचित त्याच्या आगामी सिनेमासाठी असू शकतो. कार्तिकचे दोस्ताना 2मधील काही सीन चित्रीत करणे बाकी आहे.याशिवाय तो ओम राऊतच्या एक्शन ड्रामा सिनेमातही दिसणार आहे.

Web Title: Karthik Aryan's new look has caught the attention of netizens TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.