Karisma Kapoor's 'New Innings' will do this after acting | करीश्मा कपूरची 'नवी इनिंग', अभिनयानंतर आता करणार ही गोष्ट

करीश्मा कपूरची 'नवी इनिंग', अभिनयानंतर आता करणार ही गोष्ट

बॉलिवूडची अभिनेत्री करीश्मा कपूर ही सध्या बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नसली तरी तिने एकापेक्षा एक सरस सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले होते. आता करिश्‍मा कपूर चित्रपट आणि वेबसीरिजनंतर निर्माती म्हणून पदार्पण करणार असल्याचे समजते आहे.

लॉकडाउनच्या काळात करिश्‍मा कपूरने डिजिटल माध्यमात पदार्पण केले. एकता कपूरच्या 'मेंटलहुड' या वेब सीरिजमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सीरिजला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र करिश्माच्या कामाचे कौतूक झाले. त्यानंतर आता करिश्‍मा कपूर प्रोड्यूसर म्हणून आपले नशीब आजमविण्याच्या तयारीत आहे. ती ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ऑरिजनल कंटेंट तयार करणार आहे.


दरम्यान, करिश्‍माच्या कुटुंबीयांकडून निर्माती होण्यासाठी तिला प्रोत्साहन देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, करिश्‍मा आपली बहिण करीना कपूर-खानसोबत सह-निर्माता म्हणून काम करणार असल्याचे समजते. परंतु याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तसेच प्लानिंग स्टेजही निश्‍चित करण्यात आलेले नाही.


करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जुडवा, राजा बाबू, हिरो नंबर १, राजा हिंदुस्तानी, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ है अशा अनेक सुपरहिट सिनेमात तिने काम केले आहे. बॉलिवूडपासून खूप काळ दूर राहिल्यानंतर करिश्माने नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्म मधून कमबॅक केला आहे. तिने मेंटलहूड या वेबसीरिजमध्ये काम केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karisma Kapoor's 'New Innings' will do this after acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.