बॉलिवूडची अभिनेत्री करीश्मा कपूर ही सध्या बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नसली तरी तिने एकापेक्षा एक सरस सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले होते. करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले होते. आता मात्र ते विभक्त झाले आहेत. ती तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन एकटीच करते.


करीश्माने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, तिचे लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य खूपच भयानक होऊन गेले. लग्नानंतर फक्त तिचा नवरा म्हणजेच संजय कपूरच नव्हे तर तिच्या संपूर्ण सासरची मंडळी तिचा छळ करायचे.


एका मुलाखतीत करिश्माने धक्कादायक गोष्ट सांगितली होती. ती म्हणाली की, जेव्हा ती आणि संजय हनिमूनला गेले होते तेव्हा संजयने त्याच्या काही मित्रांसोबत करिश्माचा सौदा केला होता. करिश्माने सांगितले की संजयने तिला संपूर्ण एक रात्र त्याच्या मित्रांसोबत घालण्यास सांगितले. जेव्हा ती या गोष्टीसाठी तयार झाली नाही तेव्हा त्याने तिला खूप मारले होते.


याशिवाय करिश्माने हे देखील सांगितले की सासरी तिच्या सासूसोबत पटत नव्हते. तिची सासू तिच्यावर कोणत्याही गोष्टीवरून हात उचलायची.‌ एवढेच नाही तर संजय त्याच्या भावाला करिश्मावर नजर ठेवायला सांगायचा. तसेच संजय लहान-सहान गोष्टींवरून हायपर व्हायचा आणि तिला मारायचा. करिश्माने सतरा वर्षांपूर्वी म्हणजेच २००३ ला बिझनेस मॅन संजय कपूर सोबत लग्न केले होते. या दोघांनी प्रेमविवाह केला होता मात्र त्यांचे लग्न यशस्वी होऊ शकले नाही. लग्नानंतर पाच-सहा वर्षातच त्यांच्या नात्यात कटूता आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनीही नाते संपवण्याचा निर्णय घेतला.


त्यानंतर करिष्मा तिची आई बबिता कडे येऊन राहू लागली. २०१६ या दोघांनी घटस्फोट घेतला. रिपोर्टनुसार या दोघांनी आपापसातील सामंजस्याने घटस्फोट घेतला होता. संजयने पोटगी म्हणून करिश्माला १० कोटी रुपये आणि राहण्यासाठी एक बंगला दिला होता. सध्या संजय त्याच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च सुद्धा करत आहे.


करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जुडवा, राजा बाबू, हिरो नंबर १, राजा हिंदुस्तानी, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ है अशा अनेक सुपरहिट सिनेमात तिने काम केले आहे. बॉलिवूडपासून खूप काळ दूर राहिल्यानंतर करिश्माने नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्म मधून कमबॅक केला आहे. तिने मेंटलहूड या वेबसीरिजमध्ये काम केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karisma Kapoor's husband had made a deal of her for this TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.