Karisma in goa with Deepika Padukone saying she is sick from NCB summons? | दीपिका पादुकोणसोबत करिश्मा गोव्यात?, एनसीबीच्या समन्सवर दिले होते हे कारण

दीपिका पादुकोणसोबत करिश्मा गोव्यात?, एनसीबीच्या समन्सवर दिले होते हे कारण

 ड्रग्स प्रकरणात दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशचे नाव समोर आले आहे. यानंतर एनसीबीने करिश्मा प्रकाशला समन्स पाठवला होता. करिश्माने आजारी असल्याचे सांगत सूट मागितली होती. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, करिश्मा सध्या गोव्यात आहे. 

करिश्मा दीपिकासोबत गोव्यात 
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, करिश्मा गोव्यात दीपिकासोबत आहे. दीपिका आपल्या आगामी सिनेमाची शूटिंग गोव्यात करते आहे. शकुन बत्राच्या या सिनेमाचे टायटल अजून फायनल झाले नाही. या सिनेमात सिद्धांत चुतुर्वेदी आणि अनन्या पांडेसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या आठवड्यात आपल्या क्रू सोबत दीपिका गोव्याला रवाना झाली होती.  

सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहाची तिसऱ्या दिवशी चौकशी एनसीबी करते आहे. यादरम्यान जया साहाचे जुने चॅट्स समोर आले आहेत. या चॅट्सच्या आधारावर एनसीबीने दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला मंगळवारी चौकशीसाठी बोलवले होते. 

सुशांत सिंह राजपूतची 'टॅलेंट मॅनेजर' जया साहाच्या एका कथित चॅटमध्ये D आणि K नावाचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सूत्रांनुसार, 'D'चा अर्थ दीपिका पदुकोण आणि 'K'चा अर्थ करिश्मा, असा सांगण्यात येत आहे. करिश्मा हे जया साहाच्या असोसिएटचे नाव आहे. 

माध्यमांत प्रसिद्ध झालेले दीपिका करिश्माचे चॅट
 दीपिका : आपल्याकडे माल आहे का?
 करिश्मा : आहे पण घरी आहे. मी वांद्र्यात आहे. 
करिश्मा : जर तुम्हाला हवा असेल तर अमितला सांगते.
 दीपिका : हो. प्लीज 
करिश्मा : अमितकडे आहे, तो ठेवतो. 
दीपिका : Hash ना? 
दीपिका : गांजा नाही
 करिश्मा : कोकोकडे तू केव्हा येते आहे
 दीपिका : साडे 11 ते 12 च्या दरम्यान
 

जे बात! आयुष्मान खुराणाचं 'Time 100'च्या सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत नाव, दीपिकाने लिहिली नोट...

जेव्हा दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगला म्हणते- तू माझा सुपरड्रग्स, सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karisma in goa with Deepika Padukone saying she is sick from NCB summons?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.