Ayushmann Khurrana in time 100 the most influential people list Deepika Padukone writes a note for him | जे बात! आयुष्मान खुराणाचं 'Time 100'च्या सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत नाव, दीपिकाने लिहिली नोट...

जे बात! आयुष्मान खुराणाचं 'Time 100'च्या सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत नाव, दीपिकाने लिहिली नोट...

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाला टाइम १०० च्या सर्वात प्रभावशाली लोकांच्या २०२० च्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. यावर्षीच्या टाइम १०० च्या यादीत समावेश असणारा आयुष्मान खुराणा हा एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे. त्याच्या या यशासाठी दीपिका पादुकोणने एक नोट लिहिली आहे.

दीपिकाने लिहिले की, 'मला आयुष्मान खुराणा त्याच्या 'विकी डोनर' सिनेमापासून आठवतो. तो अर्थातच वेगवेगळ्या प्रकारे एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीचा भाग राहिलाय. पण आपण आणि तुम्ही त्याच्याबाबत बोलतोय कारण त्याने अनेक यादगार सिनेमांमधून साकारलेल्या आयकॉनिक भूमिकांनी प्रभाव पाडलाय. मेल लीड रोल नेहमी एका साच्यात अडकून राहतात. तेच आयुष्मानने यशस्वीपणे स्वत:ला अशा भूमिकांमध्ये फिट केलं ज्या स्टीरिओटाइप भूमिकांना आव्हान देतात'.

दीपिकाने पुढे लिहिले की, भारतात १.३ बिलियन लोकसंख्येपैकी फार कमी लोक आहेत जे स्वत:चंं स्वप्न खरं होताना बघतात. आयुष्मान खुराणा त्यांपैकी एक आहे. तुम्ही विचार करत असाल कसा? टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर. हे सांगण्याची गरज नाही पण त्यापेक्षा जास्त गरज आहे ध्यैर्याची, दृढतेची आणि निडरतेची'.

आयुष्मान खुराणाने विकी डोनर या सिनेमातून डेब्यू केलं होतं. त्यानंतर त्याने 'अंधाधूंद' सिनेमातून सर्वांना खूश केलं. त्यासोबत शुभ मंगल सावधानमध्ये त्याने वेगळी भूमिका केली होती. नुकत्याच येऊन गेलेल्या शुभ मंगल ज्याादा सावधानमधून त्याने गे तरूणाची भूमिका साकारली. आणि बालामधून त्याने टक्कल पडलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली.  तसेच  दम लगा है हैशा, बरेली की बर्फी, आर्टिकल १५ आणि ड्रिम गर्ल सिनेमातून त्याने दमदार परफॉर्मन्स करत प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.

हे पण वाचा :

अभिनेता बनण्याचा आयुष्यमानचा निर्णय एका व्यक्तीला रुचला नव्हता. त्या व्यक्तीने लगावली होती त्याच्या कानशिलात

THROWBACK : इतक्या वर्षांत इतका बदलला आयुष्यमान खुराणा, फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

Birthday Special : वडिलांच्या 'त्या' फोनने बदलले आयुषमान खुराणाचे नशीब, किस्सा वाचून तुम्हीही व्हाल हैराण

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ayushmann Khurrana in time 100 the most influential people list Deepika Padukone writes a note for him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.