ठळक मुद्देकरिश्मा तन्ना आजवर ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे,  देस में निकला होगा चाँद,  शरारत,  कुसूम, जोर का झटका,  कॉमेडी नाइट्स विद कपिल, बिग बॉस 8, नच बलिए 7  आणि  फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी  मध्येही दिसली आहे. 

अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या कुठे आहे तर गोव्यात. (Karishma Tanna in Goa) गोव्याच्या समुद्रकिनारी करिश्मा सुट्टी एन्जॉय करतेय. आता व्हॅकेशन म्हटले की, या व्हॅकेशनचे फोटो शेअर होणारच. करिश्मा तन्नाने (Karishma Tanna)  एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. पण हे काय, तिच्या एका फोटोवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने (Richa Chadha) कशी काही कमेंंट केली की, करिश्माचा पारा चढला.

कोरोना काळात करिश्मा गोव्यात विनामास्क फिरत असल्याची पाहून कदाचित रिचाला काळजी वाटली असावी. त्यामुळेच करिश्माने एक फोटो शेअर करताच, ‘मास्क लाव’ अशी सूचना रिचाने केली. पण रिचाचा हा सल्ला करिश्माला कदाचित मानवला नाही.

रिचाने मास्क लावण्याचा सल्ला देताच करिश्माची चांगलीच सटकली. ‘प्रायव्हेट व्हिलात आहे मॅडम, पब्लिकमध्ये नाही,’असे उत्तर तिने रिचाला दिले.
अर्थात हे प्रकरण इथेच थांबले नाही. करिश्मा यानंतर चांगलीच ट्रोल झाली. अनेकांनी यावरून करिश्माची चांगलीच मजा घेतली. ‘कोरोनाला पब्लिक वा प्रायव्हेट कळत नाही,’ असे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने, ती म्हणतेय तर मास्क लाव. शेवटी आमच्याजवळ एकच तर करिश्मा आहे, अशी मजेदार कमेंट केली.

2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत असून करिश्मा तन्ना आजवर ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे,  देस में निकला होगा चाँद,  शरारत,  कुसूम, जोर का झटका,  कॉमेडी नाइट्स विद कपिल, बिग बॉस 8, नच बलिए 7  आणि  फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी  मध्येही दिसली आहे. 
तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. ‘कयामत की रात’मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. करिश्माने 2013 साली ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर रणबीर कपूरच्या ‘संजू’मध्ये तिला संधी मिळाली. या सिनेमात देखील तिने केलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karishma tanna savage reply to richa chadha on being questioned to wear mask in these photos from goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.