ठळक मुद्देमनात नसतानाही तिने अक्षयसोबत काही सिनेमे साईन केले होते. पण यानंतर मात्र अक्षयसोबत एकही सिनेमा करायचा नाही, असे करिश्माने ठरवले.

करिश्मा कपूरअक्षय कुमार या जोडीने अनेक चित्रपटांत एकत्र काम केलेय. जानवर, मेरे जीवन साथी, हां मैंने भी प्यार किया अशा अनेक सिनेमांत ही जोडी एकत्र दिसली. 1992 साली अक्षय कुमारचा  ‘दीदार’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात त्याची हिरोईन होती करिश्मा. या सिनेमाचे शूटींग सुरु झाले तेव्हा करिश्माला अक्षय कुमार जराही आवडायचा नाही.  पण पुढे हाच अक्षय करिश्माच्या मदतीला धावून आला होता.
तर  कपूर घराण्याची लेक म्हणून करिश्मा ‘दीदार’च्या सेटवर वेगळ्याच तो-यात वावरायची. याऊलट अक्षयचा कुणीच गॉडफादर नसल्याने तो डाऊन टू अर्थ होता. साहजिकच अक्षयच्या स्वभावावर भाळून सगळे त्याच्यावर फिदा असायचे. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अक्षयचा चांगला मित्र झाला होता. अशात करिश्माला कोण विचारणार? करिश्मा याचमुळे अक्षयवर बिथरली होती. एकदिवस ती इतकी भडकली ती तिने अक्षयला ‘डायरेक्टर के चमचे’ म्हटले होते.

अक्षय समोर दिसला तरी करिश्माचा पारा चढायचा. पण पर्याय नव्हता. त्याकाळी करिश्माजवळ एकही मोठा सिनेमा नव्हता. त्यामुळे मनात नसतानाही तिने अक्षयसोबत काही सिनेमे साईन केले होते. पण यानंतर मात्र अक्षयसोबत एकही सिनेमा करायचा नाही, असे करिश्माने ठरवले. केवळ अक्षयमुळे संघर्ष आणि हेराफेरी हे सिनेमे तिने नाकारले. यातील हेराफेरी हिट झाला आणि अक्षय सुपरस्टार बनला. करिश्माचे करिअर मात्र फार काही समाधानकारक नव्हते.

साहजिकच करिअर वाचवण्यासाठी तिला चांगला सिनेमा व लोकप्रिय हिरो सोबत हवा होता. याचदरम्यान तिला ‘एक रिश्ता’ या सिनेमाची आॅफर आली. या सिनेमात लीड रोलमध्ये होता कोण तर अक्षय कुमार. पण तरीही करिश्माने हा सिनेमा साईन केला.

या सिनेमात अक्षय व करिश्मा सोबत दिसणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अक्षयला याबद्दल प्रश्नही विचारले गेले होते. पण अक्षयला करिश्मासोबत काम करण्यास कुठलीही अडचण नव्हती. इंडस्ट्रीतील अनेकांनी सुरुवातीला मला वाईट वागणूक दिली. पण मी असे काहीही करणार नाही, असे अक्षयने म्हटले होते. पुढे अक्षय व करिश्माचा हा सिनेमा हिट झाला. तोपर्यंत  करिश्माच्या मनातील अक्षयबद्दलचा रागही निवळला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karishma kapoor refused to work with akshay kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.