करिश्मा कपूर सिनेमात झळकत नसली तरीही  सध्या सोशल मीडियावर ती बर्‍यापैकी अ‍ॅक्टिव असते.  करिश्मा कपूर नेहमीच तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करत वाहवा मिळवत असते. आता पुन्हा एकदा करिश्माने तिचा एक फोटो शेअर केला आहे.  ज्यामध्ये तिचे एब्स स्पष्ट दिसत आहेत. करिश्मा कपूरने तिच्या वर्कआउटचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्या पोटावर तयार झालेले  एब्जही पाहू शकतो.

करिश्माचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहतेही बरीच प्रतिक्रिया देत आहेत. इतकेच नाहीतर सेलिब्रेटी देखील तिच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत. एकीकडे तिच्या फिटनेसचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे चाहते तिच्या लूक्सवरही फिदा होत आहे. क्रॉप टॉप आणि शॉर्ट्समध्ये करिश्मा फारच सुंदर दिसत असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांचे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


90 च्या दशकात करिश्मा कपूरचा बॉलिवूडमध्ये चांगलाच दबदबा होता. मात्र लग्नानंतर करिश्मा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. म्हणायला काही वेबसीरिज व जाहिरातीत ती दिसते. पण ते पुरेसे नाही,अशात लोलो इतके लक्झरी आयुष्य जगते तरी कसे? असा प्रश्न चाहत्यांना साहजिकच पडतो.करिश्मा उत्तम अभिनेत्री असल्यासोबत एक उत्तम बिझनेस वुमनही आहे.


वेगवेगळ्या ब्रँडमध्येही करिश्माने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तिला चांगले उत्पन्न मिळते.  संजयने आपल्या मुलांच्या नाव 14 कोटींचे बॉन्ड खरेदी केले आहेत. याच्या व्याजापोटी करिश्माला महिन्याला 10 लाख मिळतात. इतकेच नाही तर पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मिळालेल्या पोटगीच्या रकमेतूनही ती आजही आलिशान आयुष्य जगते. करिश्मा आपल्या दोन मुलांसोबत मुंबईच्या खारस्थित फ्लॅटमध्ये राहते. घटस्फोटानंतर संजयने हा फ्लॅट तिला दिला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karishma kapoor flaunts Abs In Latest Instagram Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.