करिश्मा कपूरची लेक समायरा कपूर दिवसेंदिवस अधिक गॉर्जिअस लूकमध्ये पाहायला मिळते. आजपर्यंत लाइमलाइटपासून दूर असलेली समायरा नेहमी आई करिश्मा कपूर आणि मावशी करिना कपूर खानसह बाहेर कुठे फिरतना दिसायची. ती जास्त सोशल मीडियावर सक्रीय नसली तरी मीडियाच्या कॅमे-यात कैद झालेले तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. इतर स्टार किडसप्रमाणे समायराही सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.  प्रत्येकाची आपली एक स्टाइल असते. 


तसेच रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच समायराने आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली आहेत. समायराने तिच्या स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घातली आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत समायरासुद्धा आपल्या हटके ड्रेसिंग आणि फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे.  समायरा ही फक्त 15 वर्षाची आहे. आई करिश्माप्रमाणेच समायरा देखील लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. 

२००६ मध्ये करिश्माने मेरे जीवन साथी या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर अनेक वर्षं ती अभिनयक्षेत्रापासून दूर राहिली. तिने डेन्जर्स इश्क या चित्रपटाद्वारे काही वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता. मात्र गेल्या सात वर्षांपासून ती कोणत्याच चित्रपटात झळकलेली नाहीये. आता अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या वेबसिरिजद्वारे ती अभिनयक्षेत्रात पुनरागमन करत आहे.

Web Title: Karishma Kapoor Daughter Samaira Kappor Hot & Bold Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.